पहिल्या प्रेमाची, पहिली कथा
शब्दही मिळत नाहीत, ही प्रेमाची व्यथा ।
पहिलं प्रेम सर्वांनाच भावून जातं
स्वप्नांच्या देशात स्वत:लाही नेतं ।
रात्रीचा दिवस करून तो तिची वाट पाहतो
एक एक क्षण त्याला वर्षासारखा जातो ।
एकवेळी त्याला वाटतं, सांगुन टाकावं एकदाचं की,
माझं तुझ्यावर प्रेम आहे
क्षणभरात विचार बदलतो अन् सांगतो,
तुझं माझं जीवन किती सेम आहे !
प्रेयसी चलाख त्याची बेचैनी ओळखुन जाते
तरीही काही बोलत नाही, तीही त्याचीच वाट पाहते ।
भेटताना प्रत्येकवेळी तो विचार करतो भविष्याचा
प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र त्याला विसर पडतो आयुष्याचा।
पहिल्या प्रेमाच्या वेळी प्रियकर असतो प्रेमवेडा
प्रेमात पडल्यावर त्यालाही रोज मिळतो धडा ।
प्रेमासाठी वाट्टेल ते करायला नेहमीच तयार
लग्नानंतर म्हणतो मात्र, जाऊ दे ना यार ।