२१. एखादी गोष्ट स्वत:ला ठीक वाटली तर जरूर करावी, इतरांमुळे कदाचित त्या गोष्टीचे मिळणारे समाधान आपण गमावून बसतो। २०. शरीरास सहन होईल तितकेच परिश्रम करावे अन्यथा शरीर कमजोर होऊन जीवन जगणे कठीण होईल.१९. इतरांबरोबर वावरताना "मी " कुणीतरी आहे असा थोड़ा जरी अहंभाव मनात आला तरी तुमची किंमत शुन्य होऊ शकते।
१८. उपाशीपोटी माणूस भांडण करतो आणि भरल्यापोटी विचार करतो म्हणून कोणताही विचार करायचा असेल तर पोट भरलेले असले पाहिजे। १७.क्षणभरही विचार करायला वेळ नसणाया व्यक्तिंना स्वप्ने कशी पडणार ?
१६.आपल्याशी सर्वांनी चांगले वागावे असे वाटत असेल तर प्रथम आपण सर्वांशी चांगले वागले पाहिजे.
15.इतरांचे सुख पाहून दू:खी होणारास कधीच सुख प्राप्त होत नाही.
14.क्षणभरासाठी का होईना ज्याच्यावर तुमचा सद्र्ढ विश्वास आहे त्याला स्मरा व स्वत:ला क्षणभर विसरा आनंद द्विगुणित होईल।
13.सत्कार्याची भावना आपल्याला प्रगतीकडे नेते तर दुश्क्रुत्याची अधोगतिकडे.
12.एखाद्या व्यक्तीतील एखादाच चांगला गुण आपल्याला भावून जातो म्हणून तो आपल्या मते श्रेष्ठ ठरतो।
11.गोड बोलण्याने फायदा होत नसेल परंतु तोटासुद्धा होत नाहीच ना ? मग गोड, चांगले का बोलू नये।
10.आपल्यामध्ये कोणते दोष आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या “जिवलग” व्यक्तीस विश्वासात घेउन विचारा।
9.समोरची व्यक्ति बोलताना त्याच्या हावभावीकडे लक्ष दिले तर त्याचा विषय तुम्हाला लवकर समजेल।
8.तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणीही तुम्हाला सुखी बनवू शकत नाही त्यासाठी तुम्ही सुख मानायला शिकले पाहिजे।
7.इतरांचे सकारात्मक लक्ष्य अपल्याकडे वेधून घ्यायचे असेल तर आपल्या अंगी आदर्शवादी गुण असायला हवेत ।
6.आपणास आलेले वाईट अनुभवही आपण इतरांना सांगू शकतो कारण त्यातुनही त्यांना चांगले शिकता येईल ।
5.सोंगाडया प्रत्येक गोष्टीचे सोंग करू शकतो परन्तु परिस्थितीचे नाही
कारण परिस्थिती आस्तित्वात असते।
4.सुखाचा एक क्षण अनुभविण्यासाठी दु:खाचा डोंगर पार करावा लागतो।
3.आपण इतरांच्या चुका काढत असाल तर त्या चुका आपल्या हातून होणार नाहीत याची दक्षता घ्यायलाच हवी.
2.आपल्या गुणदोषांसहित जो आपल्यावर प्रेम करतो तोच आपल्याबरोबर दीर्घकाल टीकू शकतो.
1.इतरांचे चांगले गुण आपण चोरी जरी केले तरी कोणताही पोलिस आपणास पकडू शकणार नाही।