जिच्यासंबधी बरेच चांगले वाईट बोलले जाते आणि तरीही जिच्यासंबंधीचे गैरसमज कधी संपत नाहीत अशी मानवी जीवनातील एकमेव गोष्ट म्हणजे “प्रेम”। प्रेम म्हणजे दुसर्याला आपले सौंदर्य प्रदान करणे इथपासून ते दुसर्याचे सर्वस्व आपल्याला घेणे इथपर्यंत. कुणाकुणाला “प्रेम” याचा अर्थ सेवावृत्ति असा वाटतो, कुणी प्रेमापोटी दुसर्यावर हक्क गाजवतात. कुणी इतरांना छ्ळत असतात तर कुणी स्वत:ला छ्ळून घेतात यातच आनंद मिळवितात. एकाचवेळी दू:ख आणि सूख घेणारी व देणारी एकाकिपणाची व्यथा व सहवासाचे समाधान भोगायला लावणारी गोष्ट म्हणजे “प्रेम” निसर्गदेवतेने मानव जातीला घातलेले कोडे म्हणजे प्रेम.
खरे प्रेम- खरे प्रेम या शब्दांचा आपण एकसारखा जप करीत असतो, पण खरे प्रेम म्हणजे नेमके काय?
आपल्यापाशी असेल ते सारे व्यक्तिमत्व, समृद्धि, विश्वास, कसल्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याची सिद्धता म्हणजे खरे प्रेम किंवा आवडत्या व्यक्तीचा अंगच्या सर्व गुणदोषासह नि;संदेह स्वीकार करणे म्हणजे खरे प्रेम. प्रेमात तडजोड नसते, कोणत्याही अटी नसतात, कसलाही करार नसतो, कोणत्याही अपेक्षा नसतात, प्रेम करण्याच्या निर्मळ आनंदासाठीच प्रेम करायचे असते. त्यात परतफेडीची अपेक्षा ठेवली तर त्यास व्यवहाराची रुक्ष कळा येते. अनादर करणे, टाकुन बोलणे सदभावना बाळगणे किंवा कठोर शासन करणे यातील एक गोष्ट सुद्धा जातीवंत प्रेमाचा नायनाट करून टाकते. खरे प्रेम माणसाला मान, सन्मान, देते, त्याच्या चुका विसरते, त्याला माया, ममता देते आणि त्याचे संरक्षण करते. प्रेमामध्ये सर्वस्व द्यायचे ते केवल देण्यातील अपार आनंदासाठी तेच देण्यासाठी असते म्हणून त्याचे इतरत्र प्रदर्शन करणे योग्य नाही. दूर अंतरावरुनही क्षणातच एकामेकातील निकटत्व खरया प्रेमाला अनुभवता येते. खरया प्रेमाला नजरभेट, स्मित हास्य, ओझरता स्पर्श, साध्या चौकशीतून व्यक्त होणारा जिव्हाळा हादेखिल पुरेसा असतो.
गोविंदाग्रज म्हणतात:
डोळे भेट दुरुन, भाव अथवा आशाही त्याला पुरे.
प्रेम हे वस्तुच्या मोलाने मोजायचे नसते,
वस्तु देण्यामागे जी भावना असते,
तिनेच त्याचे मूल्यमापन करायचे असते..
डॉ. ब्लुमफिल्ड यांनी प्रेमाची तुलना चुंबनाशी केली आहे जितक्या आतुरतेने तुम्ही प्रिय व्यक्तीचे चुंबन घ्याल तितका त्याचा खरा आनंद तुम्हा स्वत:ला आस्वादता येतो.
प्रेम कुणी कुणावर करावे याचे बंधन नाही. सुंदर आणि कुरूप, उच्च आणि नीच, विद्वान् अणि अशिक्षित, आशा विषम व्यक्तीत प्रेम जुळत नाही अशी आपली समजूत असते पण ती भ्रामक आहे. प्रेम हे फारसे तर्कशुध्द असत नही. प्रेम कोणत्या दोन व्यक्तीमध्ये निर्माण होईल याला मर्यादा नाही. प्रेमाची कसौटी फार मोठ्या त्यागावर अवलंबून नसते तर लहान सहान सुखसोयीवर आपल्या प्रियाजनांसाठी पाणी सोडण्याच्या तुमच्या तयारीवरून त्या प्रेमाचा अंदाज बांधायचा असतो. प्रेम म्हणजे शयन ग्रहातला घडिभरचा उन्माद नव्हे. तर प्रेम म्हणजे आयुष्यभराची स्नेहपूर्ण संगत होय. संगत नेहमी दोन माणसांमध्ये निर्माण होते पण ती शेवटपर्यंत निभवणे फार महत्वाचे असते.
शेवटी बायबल सांगतो, प्रेम हे मायाळु असते. प्रेम कुणाचाही मत्सर करीत नाही. अहंकाराची भाषा बोलत नाही, ते गर्विष्ठ नसते, उध्द्ट नसते, तुसडे नसते, व्यक्तीच्या चुका बोलून दाखविण्यात आनंद मानत नाही. प्रेमाला हवे असते सत्य कधी न संपणारे, प्रेमाला अजिंक्य असे या जगात काहीच नाही. प्रेमाने जग जिंकता येते त्यातच ती ताकद असते. “प्रेम” ज्याला तोंड देऊ शकणार नाही असे या जगात कुठलेच संकट नाही आणि प्रेम कधी मरतहि नाही, मरतात ती माणसे प्रेमाला शेवट नसतो. प्रेम हे अमर आहे आणि अमरच राहील।
Chandrayaan 2
5 years ago