Thursday, May 6, 2010

हे असं किती दिवस चालणार?

हे असं किती दिवस चालणार?

सकाळी उठल्यापासून ऑफिसला जाण्याची तयारी करणार,
कसाबसा नाष्टा, चहा करून आम्ही घराबाहेर पडणार,
तेंव्हा फक्त आणि फक्त आम्ही ऑफिसचाच विचार करणार,
हे असं किती दिवस चालणार?

धावत पळत लोकल पकडणार,
लोकल मध्येही आमचा ग्रुप असणार,
तिथे एकमेकांची खेचत आम्ही ऑफिसचाच विषय काढणार,
हे असं किती दिवस चालणार?

याचं काम झालं, त्याचं काम झालं,
चौथी सीट बसवा, नववी सीट बसते,
धक्काबुक्की सहन करत लोकलचा तात्पुरता प्रवास संपवणार,
तिथून बाहेर पडताना सुद्धा आम्ही ऑफिसचाच विचार करणार,
हे असं किती दिवस चालणार?


स्टेशन ते ऑफिस बरोबर कुणीही नसणार,
तेंव्हा आम्ही मोबाईलचा हेडफोन कानात अडकवणार,
गाणी ऐकत, घडाळ्याकडे बघत आम्ही ऑफिसकड़े लवकर धावणार,
हे असं किती दिवस चालणार?

कसंबसं वेळेत आम्ही ऑफिसला पोचणार,
वेळ झालाच तर बॉसचे दोन शब्द कानावर पडणार,
वॉशरुम मध्ये गेलो तरी आम्ही ऑफिसचाच विचार करणार,
हे असं किती दिवस चालणार?


स्वत:च्या जागेवर येइपर्यंत कुणीतरी
आपली वाट बघत असणार,
ज्याचं आपल्याकडे ऑफिसचच काम असणार,
दोन क्षण देवाला स्मरण्याआधीच यांना कामाची घाई असणार,
हे असं किती दिवस चालणार?


कामाला तर सुरुवात झाली पण आपण ऑफिसला पोचलो
हे सांगण्यास घरी एक फोन करणार,
तेवढ्यात बॉस आपल्याला बोलावणार,
आपण फोन ठेउन बॉसच्या कामाला धावणार,
हे असं किती दिवस चालणार?


दुपारच्या वेळी जेवायला आम्ही मित्रांसोबत असणार,
एकमेकांची विचारपूस करून झाली की ,
पुन्हा आम्ही ऑफिसच्याच विषयावर बोलणार,
हे असं किती दिवस चालणार?


दोन कागद हातात मिरवत आम्ही ५-६ वाजवणार,
चहा पाण्याला सुद्धा बॉस बसू देत नाही असं म्हणून
त्याचेच नावाने खड़े फोडणार आणि
तरीसुद्धा आम्ही ऑफिसचाच विचार करणार,
हे असं किती दिवस चालणार?


पुन्हा घरी परतान्यसथी लोकल पकदंयाची घी करणार,
लोकल मध्ये बसुनाही आम्ही ओफ्फिसचाच विषय चाघलानार,
हे असं किती दिवस चालणार?

घरी पोचल्यावर मनासारखे नाहीच झाले काही,
तर ऑफिसचा राग घरी काढणार,
आणि पुन्हा ऑफिसच्या आठवणी, विषय घरी घोळत बसणार,
हे असं किती दिवस चालणार?


२४ तासंपैकी ८ तास आम्ही ऑफिसला असणार,
तरीही राहिलेले १६ ताससुद्धा आम्ही ऑफिसचाच विचार करणार,
हे असं किती दिवस चालणार?

सेवानिवृत्ति घेऊन घरी गेलो तरी,
दुसर्यादिवशी उठून ऑफिसची तयारी करणार,
घरची मंडळी आठवण करून देतात,
तेव्हाही आम्ही ऑफिसचाच विचार करणार,
हे असं किती दिवस चालणार?

मला सांगा आम्ही स्वत:साठी कधी जगणार?
आणि इतरांसाठी कधी मरणार?

हे असं किती दिवस चालणार?
हे असं किती दिवस चालणार?