Thursday, October 7, 2010

कातळगेवाडीचा अष्टपैलू हिरा

भरत भारती तुम्ही हवे होता.

भारती तुम्ही २९ जुलैला हयात होता
भारती तुम्ही ३० जुलैला लीन झाला
गेले उलटून दिवस आता
भरत भारती तुम्ही हवे होता .

आपण श्युन्यातुन साम्राज्य उभे केले
कातळगेवाडी ग्राम उत्कर्ष मंडळातील हिरा होता
कातळगेवाडीचे पानलोट नंतरचे नंदनवन गेला न पाहता
भरत भारती तुम्ही हवे होता.

मातोश्री, तेजस समीरला
होते भुई थोड़ी पाहता पाहता
भरत भारती तुम्ही हवे होता.

भरत तुमची सर्वाना आठवण येती
नातेवाईक इष्टमित्रांना तुमचा आशीर्वाद होता
भरत भारती तुम्ही हवे होता.

तुमची नातवंडे दुडू दुडू पळता पळता
लपंडाव त्यांचा तुम्हाला पहायचा होता
भेट नाही झाली तर तुम्हाला विचारता
बाबा तुम्ही कुठे होता
भरत भारती तुम्ही हवे होता.

संसार तुमचा अर्धवट पाहिला असता
गेला तेजस, समीरचे साम्राज्य न पाहता
भरत भारती तुम्ही हवे होता.

लोकांची मने आपण ओळखुन जिंकत होता
समाजात तुम्ही मानाने जगत होता
भरत भारती तुम्ही हवे होता.

परमेश्वर देवो तुम्हास चिरशांतता
कुटुंबास देवो मनशांतीची, धैर्याची सांगता
ईति आपणास डाँ. गणपतराव बोलता
हीच आमच्या सर्वांची श्रद्धांजली आता
भरत भारती तुम्ही हवे होता।

- डाँ.गणपतराव जाधव