देशाचा विकास, सर्व काही झकास,
नाहीतर भकास, दुसरं काय?
नेत्यांची दिवाळी, नोटांची होळी,
तुमचे आमचे हाल, दुसरं काय?
सत्तेची नशा, मतदाराची दुर्दशा,
डोक्याला ताप, दुसरं काय?
राज्याचे राजकारण, समाजाचे तारण,
खुर्ची बोलणार, दुसरं काय?
खुर्चीसाठी चढ़ाओढ़, नात्यामध्येच घोडदौड़,
टिकास्त्र सोडणार, दुसरं काय?
स्वप्नांची पुर्ती, नावाची किर्ती,
करोड़ोंचे घोटाळे, दुसरं काय?
लोकांची सेवा, निमित्त ठेवा,
सरकारी मेवा, दुसरं काय?
खुर्चीसाठी घुसमट, निवडणुकीने दमछाक,
मतदारांना हाक, दुसरं काय?