Monday, November 3, 2014

तू अशी, तू कशी ?

तू अशी, तू कशी ?
तुझ्या विश्वात तुच रहाशी.

तुझं चालणं, मूंग्याना जागा देणारं
तुझं बोलणं, ओठांना त्रास न होणारं

तुझं राहाणं, नेहमीच साधेपणाचं
तुझं वागणं, विना त्रासाचं

तुझं रागावणं, सर्वांना हसवणारं
तुझं चिडणं, सर्वांना गुंतवणारं

तुझा आनंद तुझ्यात,
तरीही माझ्यात आणि सर्वांच्यात.

ती बोलली


स्वप्नात प्रेयसी माझ्याशी बोलली,
आणि बायको समोर तिने माझी पोल खोलली.

तो असा तो तसा सांगता सांगता,
तिने बायकोशी मैत्री केली.

झाले गेले विसरून जा असे सांगत,
तिने बायकोला भड़कवून दिली.

बायकोचा चेहरा पाहून,
मी केविलवाना झालो.

बादलीभर पाणी पडले अंगावर
तेंव्हा कुठे भानावर आलो.

60 (साठी)


लोकांची मने ओळखून,
जिंकलंत तुम्ही सर्वाना.
विरह सहन होत नाही,
निरोप तुमचा घेताना.

आपण ओळखता, मने सर्वांची
आपण जाणता, मर्यादा मनाची.
तुम्ही आहात ज्ञानाची मूर्ति,
मी काय वर्णावी तुमची किर्ति.

आपले वक्तव्य, मनी छाप पाडते
एकदा गोड बोललात, तीच मैत्री भासते.
आपले स्नेहाचे बोलणे, सर्वांनाच आनंद देते
विनोदी स्वभावांनी, सर्वांचे मन जिंकुन घेते.

उदण्ड आयुष्य लाभों तुम्हा, हीच आमची सदिच्छा,
निवृत्ति नंतरच्या जीवनाला हार्दिक शुभेच्छा.
-सुनिल जगदाळे