क्षणाक्षणाला आठवण येते कृष्णा
असा कसा सोडून गेलास रे.....
दुखणं खूपणं होतं काही,
कुणालाच का बोलला नाहीस रे.....
असा कसा सोडून गेलास रे......
ओस पडला तुझा मित्रपरिवार
तुझ्या विना करमत नाही रे.....
असा कसा सोडून गेलास रे......
विश्वास कसा ठेवू? तू आमच्यात नाहीस यावर
प्रत्येकाच्या मनात तू घर केलेस रे.....
असा कसा सोडून गेलास रे......
आठवणींच्या विश्वात टाकून आम्हाला
स्वतः मात्र फरार झालास रे.....
असा कसा सोडून गेलास रे......
खुप आठवण येते तुझी
आतातरी परत ये रे ......
कृष्णा लवकर परत ये रे.......
- सुनिल जगदाळे (२२ मार्च १०ः३०)