skip to main |
skip to sidebar
एक मैत्रिण असावी
माझी वाट पाहणारी
मला पाहिलं की
खुदकन हसणारी।
एक मैत्रिण असावी
की, जीला पाहताच
ह्रदय भरून यावं , तिनं हसावं
अन् मी पहात रहावं।
एक मैत्रिण असावी
की जिची मीही वाट पहावी,
पण ती नाही आली तर
जीवाची उलघाल व्हावी।
आपण कोण, कुठे व कसे आहोत याचा जर आपणच शोध घेतला तर
आपणास आपली पात्रता काय आहे याची जाणीव होईल
त्यानुसार आपण आपली प्रगती करू शकू।
म्हणून आपण नेहमीच चांगले शिकण्यासाठी प्रयत्नशील असलेच पाहिजे।
चांदण्या रात्रीत जर
कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,
गुलाबी थंडीत
जर कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,
पावसात भिजताना
जर कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,
एकाकी जीवन जगताना
जर कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,
मला आठवणीत
जगायला लावणारीसुद्धा तूच आहेस.