एक मैत्रिण असावी
माझी वाट पाहणारी
मला पाहिलं की
खुदकन हसणारी।
एक मैत्रिण असावी
की, जीला पाहताच
ह्रदय भरून यावं , तिनं हसावं
अन् मी पहात रहावं।
एक मैत्रिण असावी
की जिची मीही वाट पहावी,
पण ती नाही आली तर
जीवाची उलघाल व्हावी।
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment