Wednesday, December 31, 2008

मेरे फोटोज

http://picasaweb.google.com/suniljagdales/Sunil#slideshow

नविन वर्ष

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्या आकांक्षांचे

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्या संकल्पांचे

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्यातल्या सदगुणांचे,

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्यातल्या स्वप्नांचे,

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्या उज्ज्वल भविष्याचे,

नविन वर्ष कुणाचे
फक्त माझे आणि माझेच.

Wednesday, December 17, 2008

का असं वागतेस

मला पाहुनसुध्दा न पाहिल्यासारखं करतेस,
तू का असं वागतेस ?

फोनवरून गप्पा करतेस आणि भेटल्यावर अबोली होतेस,
तू का असं वागतेस ?

भेटीला बोलविले तर तूच उशिरा येतेस
आणि मला वाट पहायला लावतेस,
तू का असं वागतेस ?

माझ्या बावळटपणांवर मात्र खुदकन हसतेस
आणि मी हसलो तर लगेच रागवतेस,
तू का असं वागतेस ?

माझे गुणदोष दोन्ही मान्य करतेस
आणि तुझे गुणदोष मात्र तू लपवतेस,
तू का असं वागतेस ?

'प्रेम' माझ्यावर करतेस आणि
तेहि तू तुझ्या नखयातून दाखवतेस,
तू का असं वागतेस ?

Tuesday, December 16, 2008

घाई

माझी आपली नेहमीचीच घाई,
सगळे काही बदलले तरी ती बदलायची नाही।

लिप्टची वाट पाहणं मला आवडत नाही,
कारण तीही माझ्यासारखी धावत नाही,
माझी आपली नेहमीचीच घाई।

ऑफिसच्या वेळी मी गडबडीत दिसते,
टेबलावर कामाची उतरंड लागलेली असते,
कामाच्या वेळी मी स्वत:लाही विसरून जाई,
माझी आपली नेहमीचीच घाई।

क्षणभर विसाव्याला वेळ मिळत नाही,
एका पाठोपाठ एक काम करत राही,
माझी आपली नेहमीचीच घाई।

Friday, December 12, 2008

तू एकदा सांगुन तर बघ

तुला काय हवे आहे, हे मला कसे समजणार ?
त्यासाठी तू एकदा सांगुन तर बघ।

तुझ्याविना माझे जीवन अधूरे आहे,
जीवनसाथ देण्यासाठी तू एकदा सांगुन तर बघ.

आनंदातच नाही तर दू:खातही,
तुझ्यासोबत राहीन तू एकदा सांगुन तर बघ.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही त्यासाठी,
विश्वास ठेवून तू एकदा सांगुन तर बघ.

चंन्द्र, तारे तोडायला तुला सांगणार नाही,
चांदणे पहायला सोबत येईन तू एकदा सांगुन तर बघ.

एक जन्माचीच नाही तर साताजन्माची साथ देईन,
त्यासाठी तू एकदा सांगुन तर बघ.