माझी आपली नेहमीचीच घाई,
सगळे काही बदलले तरी ती बदलायची नाही।
लिप्टची वाट पाहणं मला आवडत नाही,
कारण तीही माझ्यासारखी धावत नाही,
माझी आपली नेहमीचीच घाई।
ऑफिसच्या वेळी मी गडबडीत दिसते,
टेबलावर कामाची उतरंड लागलेली असते,
कामाच्या वेळी मी स्वत:लाही विसरून जाई,
माझी आपली नेहमीचीच घाई।
क्षणभर विसाव्याला वेळ मिळत नाही,
एका पाठोपाठ एक काम करत राही,
माझी आपली नेहमीचीच घाई।
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment