क्षणभरासाठी सारं काही थांबलं होतं,
क्षणभरात आम्ही बरंच काही गमावलं होतं।
एखाद्या तरूणानं एखाद्या मुलीवर जीवापाड एकतर्फी प्रेम करावं आणि तिला मिळविण्यासाठी सर्व दुनियेशी लढावं तसं हे आतंकवादी आपल्याशी लढत होते आणि आपण मात्र बेवफा सनम सारखे फक्त ५९ तासांची वाट पहात होतो, अशातच ज्यांनी त्या आतंकावाद्यांना धड़ा शिकविण्यासाठी पुढाकार घेतला त्यांचे हातपाय आपल्याच मायबापांनी अगोदरच कापले होते आणि मरणाच्या दाढेत ढकलले तरीही ते लढले आपल्याखातर, आपल्या देशाखातर, देशावर, या मुंबईवर असलेल्या प्रेमाखातर पण याची जाणीव आमच्या थोरांमोठ्यांना कुठे ? ते फक्त स्वत:चा स्वार्थ साधत आपल्याला आश्वासनाचे डॉस देतात आणि आपण तो पोलिओचा डॉस समजून पितो आणि नंतरचा डॉस कधी आहे याची वाट पाहत बसतो. कशासाठी काय करावं याचं कारण कळत नाही तेच हे राजकारणी स्वत:च्या कारणांसाठी इतरांना फाशी देतील आणि तरीही आपण त्यांचेच पाय चाटतो, गुलामी करतो. ज्या लढ्वय्यांना लढ्ण्यासाठी आपण सामोरे पाठवतो त्यांना याच राजकारण्यांची परवानगी घ्यावी लागते तोपर्यंत मात्र तिकडे आठ-दहाजणांचे बळी पडतात. हा आमचा देश आणि असे आम्ही या देशातील देशवासी.
उठा राष्ट्रवीर हो म्हणण्यापेक्षा
उठा नेतेजण हो म्हणायला हवे आणि सर्वसामान्यासारखे यांनाही लढवायला हवे तेंव्हा……………..
म्हणतात ना…
पाण्यामध्ये मासा, झोप घेई कैसा,
जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळेल.
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment