Wednesday, December 30, 2009

सुविचार

स्वत:च्या कर्तुत्वाबद्दल पूर्ण खात्री असलेला मनुष्य कधीच अपयशी होऊ शकत नाही



आपल्या हाताने गुंफलेली माळ, आपल्या हातानी उगाळलेले चन्दन, आपण लिहिलेली माहिती ही इन्द्रलोकांतील सुखापेक्षाही अधिक शोभिवंत होते.

माणुस कशासाठी ?

माणुस जगतो फक्त स्वत:साठी
स्वत:चे दू:ख विसरून सुख मिळविण्यासाठी

माणुस झुरतो फक्त प्रेमासाठी
अनोळखी व्यक्तीच्या मिलनासाठी

माणुस खेळतो फक्त जीवासाठी
जीवाला मी सुखी आहे हे पटविण्यासाठी

माणुस कष्टतो फक्त सुखासाठी
टिचभर पोटात लागलेल्या भुकेसाठी

माणुस नेसतो फक्त लज्जेसाठी
जगात मिरविताना लाज लपविण्यासाठी

माणुस मरतो तोही स्वार्थासाठी
नीतीला पसंत असलेल्या अन्तासाठी

Thursday, November 26, 2009

भावपूर्ण श्रध्दांजली।

ज्यांनी लाखो मुंबईकरांना वाचविण्यासाठी आपले प्राण पणाला लावले त्या सर्व शहीद लढवय्यांना , तसेच त्यांच्या सहकार्यांना भावपूर्ण श्रध्दांजली। आणि मुंबई पोलिसांचे शतश: आभार।

-सुनील जगदाळे

Wednesday, November 25, 2009

तेंव्हा कळेल २६/११

क्षणभरासाठी सारं काही थांबलं होतं,
क्षणभरात आम्ही बरंच काही
गमावलं होतं।

एखाद्या तरूणानं एखाद्या मुलीवर जीवापाड एकतर्फी प्रेम करावं आणि तिला मिळविण्यासाठी सर्व दुनियेशी लढावं तसं हे आतंकवादी आपल्याशी लढत होते आणि आपण मात्र बेवफा सनम सारखे फक्त ५९ तासांची वाट पहात होतो, अशातच ज्यांनी त्या आतंकावाद्यांना धड़ा शिकविण्यासाठी पुढाकार घेतला त्यांचे हातपाय आपल्याच मायबापांनी अगोदरच कापले होते आणि मरणाच्या दाढेत ढकलले तरीही ते लढले आपल्याखातर, आपल्या देशाखातर, देशावर, या मुंबईवर असलेल्या प्रेमाखातर पण याची जाणीव आमच्या थोरांमोठ्यांना कुठे ? ते फक्त स्वत:चा स्वार्थ साधत आपल्याला आश्वासनाचे डॉस देतात आणि आपण तो पोलिओचा डॉस समजून पितो आणि नंतरचा डॉस कधी आहे याची वाट पाहत बसतो. कशासाठी काय करावं याचं कारण कळत नाही तेच हे राजकारणी स्वत:च्या कारणांसाठी इतरांना फाशी देतील आणि तरीही आपण त्यांचेच पाय चाटतो, गुलामी करतो. ज्या लढ्वय्यांना लढ्ण्यासाठी आपण सामोरे पाठवतो त्यांना याच राजकारण्यांची परवानगी घ्यावी लागते तोपर्यंत मात्र तिकडे आठ-दहाजणांचे बळी पडतात. हा आमचा देश आणि असे आम्ही या देशातील देशवासी.

उठा राष्ट्रवीर हो म्हणण्यापेक्षा
उठा नेतेजण हो म्हणायला हवे आणि सर्वसामान्यासारखे यांनाही लढवायला हवे तेंव्हा……………..

म्हणतात ना…

पाण्यामध्ये मासा, झोप घेई कैसा,
जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळेल.

Thursday, November 12, 2009

घर माझे आणि समाजाचेही

घर माझे तसेच तुझेही
घर माझे तसेच समाजाचेही ।

माझ्या घराची निगा मीच राखायला हवी ,
माझ्या समाजाची चिंता मीच करायला हवी ।

माझ्या घरात अस्वच्छता मला आवडत नाही ,
समाजातील घाणीकडे कुणी डुंकुनही पाहत नाही ।

.................................................
.................................................

कलियुगाप्रमाने मलाही बदलायला हवे ,
माझ्या घरासकट समाजालाही बदलायला हवे ।

Friday, November 6, 2009

Direct email se

Me aata direct email varna majhya kavita post karaycha prayatna kartoy,
 
Sunil

Tuesday, July 21, 2009

माणुसकी


माणसाने माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकीस सांभाळणे.
परन्तु , माणुसच जर राक्षसासारखी वागणुक करायला लागला तर ?

कित्येकदा माणसाला सांगावे लागते : माणसा! माणसासारखे वाग.
हे सांगुन जो माणसांमध्ये परिवर्तन घडवून आणतो त्यास " त्या " माणसाचा गुरु असे म्हटले जाते.

जीवनात राक्षसी वृत्तीचे लोक खुप आहेत त्यांना सुधारावयाला हवे, साध्या साध्या गोष्टीतून त्यांचे विचार बदलायला हवेत।

प्रत्येकाने आपल्या आसपासच्या लोकांमधील वाईट वृत्तीना मुठमाती दिली पाहिजे तरच आपण आणि आपला परिसर आपण सुधारल्याचा आनंद आपणास मिळेल आणि तो आनंद दिर्घकाळ टिकेल.

Friday, May 29, 2009

जीतू तुझ्यासाठी

तू माझ्यासारखा आहेस
असं मला एका मुलीने सांगितलं,
मी म्हणालो तो अभिनेता , ... , ... ,
तो नाही मी त्याच्यासारखा आहे.

तिच्या सांगण्यावरून मी
तुझी "कँम्पस" मालिका पाहिली,
तुला पाहताना मात्र मला
माझीही आठवण नाही राहिली .

तुझं ते लाडिवाळ बोलणं
मनाला भुरळ पाडायचं ,
नकळत का होईना पण
तुझ्याशी नातं जडायचं .

तुला पाहण्यासाठी मला
आठ दिवस थांबावे लागायचे ,
कँम्पस मार्फत मग आम्ही
तुझ्याशी योग साधायचे .

तुझ्याशी संवाद साधायला
मी वाट्टेल ते करीन ,
वेळ पडलीच तर
देवालाही स्मरीन .

कविता करणं हा तुझा छंद आहे
भावनांचा कलश आणि शब्दांचा बांध आहे .

तुझ्या शब्दांनी तू
जिंकुन घेतलंस तरुणाईला ,
"शब्द" शब्दाला कसा जोडायचा
हे तूच शिकाविलंस आम्हाला .


Wednesday, April 22, 2009

प्रेम पुराण

जिच्यासंबधी बरेच चांगले वाईट बोलले जाते आणि तरीही जिच्यासंबंधीचे गैरसमज कधी संपत नाहीत अशी मानवी जीवनातील एकमेव गोष्ट म्हणजे “प्रेम”। प्रेम म्हणजे दुसर्याला आपले सौंदर्य प्रदान करणे इथपासून ते दुसर्याचे सर्वस्व आपल्याला घेणे इथपर्यंत. कुणाकुणाला “प्रेम” याचा अर्थ सेवावृत्ति असा वाटतो, कुणी प्रेमापोटी दुसर्यावर हक्क गाजवतात. कुणी इतरांना छ्ळत असतात तर कुणी स्वत:ला छ्ळून घेतात यातच आनंद मिळवितात. एकाचवेळी दू:ख आणि सूख घेणारी व देणारी एकाकिपणाची व्यथा व सहवासाचे समाधान भोगायला लावणारी गोष्ट म्हणजे “प्रेम” निसर्गदेवतेने मानव जातीला घातलेले कोडे म्हणजे प्रेम.

खरे प्रेम- खरे प्रेम या शब्दांचा आपण एकसारखा जप करीत असतो, पण खरे प्रेम म्हणजे नेमके काय?

आपल्यापाशी असेल ते सारे व्यक्तिमत्व, समृद्धि, विश्वास, कसल्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याची सिद्धता म्हणजे खरे प्रेम किंवा आवडत्या व्यक्तीचा अंगच्या सर्व गुणदोषासह नि;संदेह स्वीकार करणे म्हणजे खरे प्रेम. प्रेमात तडजोड नसते, कोणत्याही अटी नसतात, कसलाही करार नसतो, कोणत्याही अपेक्षा नसतात, प्रेम करण्याच्या निर्मळ आनंदासाठीच प्रेम करायचे असते. त्यात परतफेडीची अपेक्षा ठेवली तर त्यास व्यवहाराची रुक्ष कळा येते. अनादर करणे, टाकुन बोलणे सदभावना बाळगणे किंवा कठोर शासन करणे यातील एक गोष्ट सुद्धा जातीवंत प्रेमाचा नायनाट करून टाकते. खरे प्रेम माणसाला मान, सन्मान, देते, त्याच्या चुका विसरते, त्याला माया, ममता देते आणि त्याचे संरक्षण करते. प्रेमामध्ये सर्वस्व द्यायचे ते केवल देण्यातील अपार आनंदासाठी तेच देण्यासाठी असते म्हणून त्याचे इतरत्र प्रदर्शन करणे योग्य नाही. दूर अंतरावरुनही क्षणातच एकामेकातील निकटत्व खरया प्रेमाला अनुभवता येते. खरया प्रेमाला नजरभेट, स्मित हास्य, ओझरता स्पर्श, साध्या चौकशीतून व्यक्त होणारा जिव्हाळा हादेखिल पुरेसा असतो.

गोविंदाग्रज म्हणतात:

डोळे भेट दुरुन, भाव अथवा आशाही त्याला पुरे.

प्रेम हे वस्तुच्या मोलाने मोजायचे नसते,
वस्तु देण्यामागे जी भावना असते,
तिनेच त्याचे मूल्यमापन करायचे असते..

डॉ. ब्लुमफिल्ड यांनी प्रेमाची तुलना चुंबनाशी केली आहे जितक्या आतुरतेने तुम्ही प्रिय व्यक्तीचे चुंबन घ्याल तितका त्याचा खरा आनंद तुम्हा स्वत:ला आस्वादता येतो.

प्रेम कुणी कुणावर करावे याचे बंधन नाही. सुंदर आणि कुरूप, उच्च आणि नीच, विद्वान् अणि अशिक्षित, आशा विषम व्यक्तीत प्रेम जुळत नाही अशी आपली समजूत असते पण ती भ्रामक आहे. प्रेम हे फारसे तर्कशुध्द असत नही. प्रेम कोणत्या दोन व्यक्तीमध्ये निर्माण होईल याला मर्यादा नाही. प्रेमाची कसौटी फार मोठ्या त्यागावर अवलंबून नसते तर लहान सहान सुखसोयीवर आपल्या प्रियाजनांसाठी पाणी सोडण्याच्या तुमच्या तयारीवरून त्या प्रेमाचा अंदाज बांधायचा असतो. प्रेम म्हणजे शयन ग्रहातला घडिभरचा उन्माद नव्हे. तर प्रेम म्हणजे आयुष्यभराची स्नेहपूर्ण संगत होय. संगत नेहमी दोन माणसांमध्ये निर्माण होते पण ती शेवटपर्यंत निभवणे फार महत्वाचे असते.

शेवटी बायबल सांगतो, प्रेम हे मायाळु असते. प्रेम कुणाचाही मत्सर करीत नाही. अहंकाराची भाषा बोलत नाही, ते गर्विष्ठ नसते, उध्द्ट नसते, तुसडे नसते, व्यक्तीच्या चुका बोलून दाखविण्यात आनंद मानत नाही. प्रेमाला हवे असते सत्य कधी न संपणारे, प्रेमाला अजिंक्य असे या जगात काहीच नाही. प्रेमाने जग जिंकता येते त्यातच ती ताकद असते. “प्रेम” ज्याला तोंड देऊ शकणार नाही असे या जगात कुठलेच संकट नाही आणि प्रेम कधी मरतहि नाही, मरतात ती माणसे प्रेमाला शेवट नसतो. प्रेम हे अमर आहे आणि अमरच राहील।

Thursday, April 9, 2009

आई

बदलत्या युगात “आई” हा शब्दच पूर्णपणे नाहीसा होत चालला आहे . लहान मुले असोत किंवा तरुण मोठी मंडळी असोत यांच्यामध्ये आपण आपल्या आईला “आई” म्हणायचे म्हणजे एक कनिष्ठ दर्जाचे वर्तन मानले जाऊ लागले आहे, कारण सुशिक्षित पिढयांमध्ये आईला “मम्मी” म्हटले जाते. याहि पुढची पद्धती म्हटली तर मम्मी ऐवजी "ममा" म्हणणे म्हणजे उच्च लोकांच्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात आहे. त्यामुळे आई कोणास व का म्हणावे हे सध्याच्या पिढीला सांगावे लागणार आहे .

आईविषयी बोलायचे अथवा सांगायचे म्हटले तर मी म्हणेन की
“जिसके भाग्य में है माँ की पूजा, उससे सुखी कोई न दूजा."

कारण आईचे ऋण अफाट आहे त्याची गणना कोणीही करू शकत नाही आणि ते ऋण फेडुहि शकत नाही मात्र आईची सेवा करून ते कमी करता येते आणि जन्म दिलेल्या आईची सेवा ज्याच्या नशिबी मिळते त्याच्यासारखा भाग्यवान दूसरा कुणीही नाही. कारण जर आईची सेवा आपल्या नशिबी लाभत नसेल किंवा आईचे प्रेम, माया, आईची छाया ज्याला लाभली नसेल त्याच्यासाठी कितीही पैसा, ऐश्वर्य धन, दौलत मिळाली तरी त्याचा काही एक उपयोग नाही आणि त्यातून सुख, आनंद मिळु शकत नाही कितीही धनसंपत्ति असेल तरी तो आईच्या प्रेमाचा भुकेला असतोच. आई नसल्याने त्याला आईची उणीव ही जाणवतेच .

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”

म्हणुन जन्मास आलेल्या प्रत्येक मानवास आईचे प्रेम, महत्व हे कळायलाच हवे. आईचे उपकार किती मोठे आहेत हे समजायलाच हवे.

कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन त्याची विविध कलाकृति तयार करतो. गणपति , गौरी यासारख्या मूर्ति तयार करतो त्याप्रमाणे आई आपल्या मुलाला जन्म दिल्यापासून त्यास चांगले वर्तन लाभावे, सद्गुण प्राप्त व्हावेत, सर्व कला त्यास अवगत व्हाव्यात यासाठी ती तसे शिक्षण देत असते आणि सुसंस्कृत मूर्ति घडविण्याचा ती प्रयत्न करीत असते, पण त्याच आईची सेवा करायला तुम्हा -आम्हाला लाज वाटते कारण आईने जन्म देऊन आपल्यावर ऋण केले आहे हे आपण मान्यच करीत नाही. आईने जन्म दिला म्हणजे तिचे कर्तव्य तिने पार पाडले असे म्हणणारे मुर्खच ते मान्य करीत नाहीत. पण ज्या आईने आपल्याला शरीर दिले , जिने आपल्याला जन्म देण्यासाठी ९ महीने स्वत: त्रास सहन करून गर्भाशयात आपली वाढ केली आणि ही मूर्ति घडवली की ज्यामुळे आपण हे जग पाहू शकलो त्या आईविषयी आपण असे बोलणे किती लज्जास्पद व मुर्खपणाचे लक्षण आहे.

इतकेच नव्हे तर स्वत:च्या प्रश्नापेक्षा, प्राणांपेक्षा जास्त आपल्याला जपले आणि जन्म दिल्यानंतर तर एक एक गोष्ट तिने त्यागून आपल्या शरीराचे संरक्षण करीत आपल्याला मोठे केले त्याचे उपकार आपण अशा प्रकार फेडतो ही किती वाईट गोष्ट आहे. जर तुम्ही म्हणत असाल की आपल्याला जन्म देऊन आईने तिचे कर्तव्य पार पाडले आहे तर तुम्हाला या पृथ्वीतलावर जगण्याचा काही एक अधिकार नाही त्यापेक्षा मरण पत्करावे.

Thursday, February 26, 2009

स्वप्नपुर्ती झाली

मी साधारण ६ वर्षाचा असेन तेंव्हा माझ्या गावामध्ये एक आणि एकच T.V. होता त्यावेळी आम्ही २५ पैसे देऊन "रामायण" ही मलिका पाहत असू. हळूहळू सुधारणा होत गेली आणि गावात लोकांकडे T.V. येऊ लागले. मी आता T. V. वरचे मराठी, हिन्दी चित्रपट पाहू लागलो होतो.

मी आता साधारण १० वर्षाचा झालो होतो तेंव्हा मनाशी एक स्वप्न पाहिले, की मीही एक दिवस, एकातरी T. V. सीरियल मध्ये, एकदातरी कलाकार म्हणून काम करणार. आणि माझी ती इच्छा, ते स्वप्न अखेर २० फेब्रुवारी , २००९ रोजी 'E T.V. मराठी च्या "क्राइम डायरी" या मलिकेमधुन साकार झालं।

लहानपणी पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झालं

ज्यांनी ही मलिका पाहिली असेल त्यांनी प्लीज आपल्या प्रतिक्रिया मला कळवाव्यात ज्याचा मला भविष्यात उपयोग होईल।

Thursday, February 5, 2009

तू भेटल्यापासून

तू भेटल्यापासून मी स्वत:ला बदलत होतो,
तू असतानाही मी स्वत:लच विसरत होतो.

तू भेटल्यापासून माझी नजर मलाच शोधत होती,
तुझ्याकडे पाहून माझ्या आकांक्षा वाढवित होती.

तुझ्या भेटीने बदलले मीही स्वत:ला,
मग मात्र माझ्या आनंदाला पारावार नाही उरला.

तू भेटल्यापासून चांगल्यावाईटातला फरक कळू लागला,
काहीतरी चांगले कमावल्याचा आनंद मिळू लागला.

तू भेटल्यापासून मला जीवनाची नवी उमेद मिळाली,
जगण्याचीच नव्हे तर तुझ्यासाठी मरण्याचीही रित कळाली.

तू भेटल्यापासून माझे आयुष्यच बदलत गेले,
आयुष्य काय असते हे तर तूच पटवून दिले.

तू भेटल्यापासून जीवनात चढ़-उतार चालू होता,
तू दुरावल्यापासून आठवणींचा डोंगर उभा राहिला होता.

Monday, January 19, 2009

घरकुल

घरकुल माझे असे असावे,
सुखदू:खाच्या वाटा विसरुनी जावे।

माणुसकीच्या नात्याने,
प्रेमभया हाताने
सर्वांना आपलेसे करुनी घ्यावे।

जीवनाच्या संघर्षातुनी,
मानवतेच्या स्पर्शातुनी
पुन्हा फुलासारखे उमलत रहावे।

घरकुल माझे असे असावे,
सुखदू:खाच्या वाटा विसरुनी जावे।