Thursday, April 9, 2009

आई

बदलत्या युगात “आई” हा शब्दच पूर्णपणे नाहीसा होत चालला आहे . लहान मुले असोत किंवा तरुण मोठी मंडळी असोत यांच्यामध्ये आपण आपल्या आईला “आई” म्हणायचे म्हणजे एक कनिष्ठ दर्जाचे वर्तन मानले जाऊ लागले आहे, कारण सुशिक्षित पिढयांमध्ये आईला “मम्मी” म्हटले जाते. याहि पुढची पद्धती म्हटली तर मम्मी ऐवजी "ममा" म्हणणे म्हणजे उच्च लोकांच्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात आहे. त्यामुळे आई कोणास व का म्हणावे हे सध्याच्या पिढीला सांगावे लागणार आहे .

आईविषयी बोलायचे अथवा सांगायचे म्हटले तर मी म्हणेन की
“जिसके भाग्य में है माँ की पूजा, उससे सुखी कोई न दूजा."

कारण आईचे ऋण अफाट आहे त्याची गणना कोणीही करू शकत नाही आणि ते ऋण फेडुहि शकत नाही मात्र आईची सेवा करून ते कमी करता येते आणि जन्म दिलेल्या आईची सेवा ज्याच्या नशिबी मिळते त्याच्यासारखा भाग्यवान दूसरा कुणीही नाही. कारण जर आईची सेवा आपल्या नशिबी लाभत नसेल किंवा आईचे प्रेम, माया, आईची छाया ज्याला लाभली नसेल त्याच्यासाठी कितीही पैसा, ऐश्वर्य धन, दौलत मिळाली तरी त्याचा काही एक उपयोग नाही आणि त्यातून सुख, आनंद मिळु शकत नाही कितीही धनसंपत्ति असेल तरी तो आईच्या प्रेमाचा भुकेला असतोच. आई नसल्याने त्याला आईची उणीव ही जाणवतेच .

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”

म्हणुन जन्मास आलेल्या प्रत्येक मानवास आईचे प्रेम, महत्व हे कळायलाच हवे. आईचे उपकार किती मोठे आहेत हे समजायलाच हवे.

कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन त्याची विविध कलाकृति तयार करतो. गणपति , गौरी यासारख्या मूर्ति तयार करतो त्याप्रमाणे आई आपल्या मुलाला जन्म दिल्यापासून त्यास चांगले वर्तन लाभावे, सद्गुण प्राप्त व्हावेत, सर्व कला त्यास अवगत व्हाव्यात यासाठी ती तसे शिक्षण देत असते आणि सुसंस्कृत मूर्ति घडविण्याचा ती प्रयत्न करीत असते, पण त्याच आईची सेवा करायला तुम्हा -आम्हाला लाज वाटते कारण आईने जन्म देऊन आपल्यावर ऋण केले आहे हे आपण मान्यच करीत नाही. आईने जन्म दिला म्हणजे तिचे कर्तव्य तिने पार पाडले असे म्हणणारे मुर्खच ते मान्य करीत नाहीत. पण ज्या आईने आपल्याला शरीर दिले , जिने आपल्याला जन्म देण्यासाठी ९ महीने स्वत: त्रास सहन करून गर्भाशयात आपली वाढ केली आणि ही मूर्ति घडवली की ज्यामुळे आपण हे जग पाहू शकलो त्या आईविषयी आपण असे बोलणे किती लज्जास्पद व मुर्खपणाचे लक्षण आहे.

इतकेच नव्हे तर स्वत:च्या प्रश्नापेक्षा, प्राणांपेक्षा जास्त आपल्याला जपले आणि जन्म दिल्यानंतर तर एक एक गोष्ट तिने त्यागून आपल्या शरीराचे संरक्षण करीत आपल्याला मोठे केले त्याचे उपकार आपण अशा प्रकार फेडतो ही किती वाईट गोष्ट आहे. जर तुम्ही म्हणत असाल की आपल्याला जन्म देऊन आईने तिचे कर्तव्य पार पाडले आहे तर तुम्हाला या पृथ्वीतलावर जगण्याचा काही एक अधिकार नाही त्यापेक्षा मरण पत्करावे.

1 comment:

Khushal said...

I like your feeling. I hope all of us do our duty not only to our parents but also care for all elderly persons near us,

Khushal