Friday, September 16, 2011

मलाही वाटतं .....

या धावत्या जगात
क्षणभर तरी आरामात बसावं ,
मलाही वाटतं एक दिवस
बिल्कुल शांत रहावं .

ना कुणाची ट्रिंग ट्रिंग
ना कुणाचे व्हायब्रेशन ,
वर्षातून एकदातरी
आपणही करावं सेलिब्रेशन .

ना कुणाच्या हाती लागावं
ना कुणाच्या कानी ,
एक दिवस का होईना
विसरावी सर्वांचीच वाणी .

केलेले Dialled Calls
झालेले Missed Calls
आलेले Received Calls
सगळं काही विसरावं,
मलाही वाटतं एक दिवस
बिल्कुल शांत रहावं .

Monday, September 12, 2011

प्रेमात पडू लागल्यावर

आठवणींचा कहर होतो
सद्गुणांना बहर येतो,
सगळे काही पवित्र वाटू लागते
प्रेमात पडू लागल्यावर .

तहान विरून जाते
भूक हरपून जाते,
सगळे काही विसरायला होते
प्रेमात पडू लागल्यावर .

शब्द मुके होतात
विरह नकोसा होतो,
सतत सोबत रहावेसे वाटते
प्रेमात पडू लागल्यावर .

जग जिंकायचे आहे
बरेच काही कमवायचे आहे,
हे असे वेड्यासारखे होऊ लागते
प्रेमात पडू लागल्यावर .