Monday, September 12, 2011

प्रेमात पडू लागल्यावर

आठवणींचा कहर होतो
सद्गुणांना बहर येतो,
सगळे काही पवित्र वाटू लागते
प्रेमात पडू लागल्यावर .

तहान विरून जाते
भूक हरपून जाते,
सगळे काही विसरायला होते
प्रेमात पडू लागल्यावर .

शब्द मुके होतात
विरह नकोसा होतो,
सतत सोबत रहावेसे वाटते
प्रेमात पडू लागल्यावर .

जग जिंकायचे आहे
बरेच काही कमवायचे आहे,
हे असे वेड्यासारखे होऊ लागते
प्रेमात पडू लागल्यावर .

No comments: