Wednesday, October 17, 2012

एक नातं

एक नातं घरांशी,

हक्काच्या घरातील वस्तुशी

ज्या असतात आपुलकीने जपलेल्या ॰


एक नातं घरातील माणसांशी

आचार-विचारांच्या एकजुटीशी

ज्यामध्ये मिळते सुख आणि समाधान ॰


एक नातं माणसांमधील प्रेमाशी

विश्वासाने उभारलेल्या अतुट बंधनाशी

ज्यात नसतो नफा तोटा, असते फक्त प्रेम आपुलकी ॰


एक नातं प्रेमांमधील भावनेशी

हसण्या- रुसण्याच्या गोड स्वभावाशी

ज्यात असतो त्याग, सर्वांच्या सुखासाठी ॰


एक नातं घरांशी आणि घरातील सर्वच जणांशी ..............


-सुनिल जगदाळे

No comments: