आवड मला शाळेची शाळेत जायचं, शाळा शिकुनी मोठं व्हायचं
शेजारचा हा पिंटया मजला लागलाय बोलवायला
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या. ।।धृ।।
शाळेतली पोरं लय लय गुणी, शाळेत म्हणतात पिक्चरची गाणी
एकजुटीने, गोळा होऊन, गोष्टी सांगायला......लागले गोष्टी सांगायला,…
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या. ।।१।।
शाळेत पिंटयाचा रोजचा धिंगाना, पिक्चरमुळे हा झाला दिवाना
दादागिरी करून, इतरांना मारून, भाई हा बनायला....लागला भाई हा बनायला....
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या. ।।२।।
पिंटयाच्या मनात वेगळच आलं, एकाएकी डोळयात पाणी आलं
अभ्यास करून, नंबर काढून, नाव हयो कमवायला..... लागला नाव हयो कमवायला
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या.
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या...