Wednesday, December 10, 2014

जाऊ दे शाळेला


आई मला जाऊ दे शाळेला
दोन चार अक्षर शिकायला ।।धृ।।

शाळेत मी जाईन, फौजदार होईन
गुंड, चोरांना पकडून देईन
सरकार कडून बक्षीसे मिळवायला...

शाळेत मी जाईन, डॉक्टर होईन
पेशंट लोकाना, इंजेक्शन करीन
आजारातून वाचवायला ...

शाळेत मी जाईन, शिक्षक होईन
चुका करणा-याना शिक्षा देईन
आदर्श घड़वायला...

शाळेत जाईन, माणूस होईन
सर्व समाजाला प्रगतिकड़े नेईन
विकास करायला ...

No comments: