आज-काल मिडीयावर विरंगुळा कमी
आणि श्रद्धांजली जास्त वाचावी लागते,
अशी बातमी वाचताना मग,
आपलेही काळीज थरथरते.
कुणी गावाकडचे, तर कुणी शहराकडचे
कधी इकडचे, तर कधी तिकडचे
कोण नात्यातले, तर कोण ऑफिसातले,
वेळ खराब असेल, तर आपल्याच घरातले.
काळजात धस्स होते, हे सगळे ऐकून
कुठे गेला देवा आम्हां, एकट्याला टाकून
एकदा असेच अचानक, माझेही डोळे पाणावले,
कोरोनाच्या या महामारीत, जेव्हा माझेच मी गमावले.
नकोय ते दु:ख, नकोय त्या यातना,
थांबव सर्व महामारी, हीच देवा प्रार्थना,
पुरे झाले मृत्यू तांडव, आता तरी धाव रे
कर काहीतरी चमत्कार, आणि वाचव शहरें, गाव रे.
- सुनिल जगदाळे
No comments:
Post a Comment