Thursday, June 19, 2008

त्यातच सारं आलं.

तू मला नाही फसलीस
पण मागे फिरून हसलीस
त्यातच सारं आलं,


गजबजलेल्या गर्दीत

माझी नजर तुला शोधते,
दुरुनसुद्धा तू

माझी नजर रोखते
त्यातच सारं आलं,


नजरेस नजर देताना
उगाच घाबरायला होते
तू माझ्याकडे

चोरून चोरून पाहते
त्यातच सारं आलं,


क्षणभर तुझे आस्तित्व
तुही विसरतेस
मलाही आस्तित्वाची

जाणीव करून देतेस
त्यातच सारं आलं.

Thursday, June 12, 2008

थोडसं हसू

आज मला
मनापासून वाटतं की,
तू भेटावस
एकदा वाटतं
न भेटलेलं चांगलं ,
कारण मी आज
तू घेतलेला शर्ट
घातला नाही
जाऊ दे..........
येताना पँट घेउन ये।
नंतर तुला भेटताना
दोन्ही घालून
तुला दाखवायला येइन.


Monday, June 9, 2008

तू

प्रत्येक क्षणी
तुला पाहावस वाटतं।
प्रत्येक क्षणी तू
मजपाशी असावसं वाटतं।
माझ्या वागन्यावर
तुझं लक्ष्य असावं।
माझ्या बोलन्यावर
तुझं नियंत्रण असावं।
मी कष्ट करावं
तू फक्त पाहात बसावं।
मी चुक केल्यावर
माझ्यावर रागवावं।
अन तू रागावल्यावर
अधिकच छान दिसतेस हे मी सांगावं।
त्यासाठी तू सतत
माझ्याबरोबर असावं।

Friday, June 6, 2008

पक्षी

दोन टोकावरचे दोन पक्षी खुनावतात एकमेकांना
राघुमैनेचे गोडगुपित जणू सांगतात सर्वांना ।


इश्यार्र्यातून वाचा फूटते त्यांच्या गुप्त भावनांना,
मूक पक्ष्यांची भाषा समजते प्रेम वेड्या मनांना।

राघुमैनेचे गुपित सांगून दोन जीव येतात एकत्र,
मैत्रिचे धडे गातात सप्त सुरांतून सर्वत्र।

मोर बोले मोरनीला राघू मैना किती हुशार,
जाणते अजाणतेपणी करती प्रेमाचा भडिमार।

नवलापोटी पक्ष्याना वाटे अशी असावी जवानी,
कोकिलासुद्धा गोड-गोड गाई राघुमैनेचिच कहानी।


पाउस

पावसाची सुरूवात झाली, क्षणभरासाठी तप्त उन्हाचा विसर पडला। सर्वजन ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तो मेघराजा एकदाचा सुखद क्षण घेउन आलाच.

Thursday, June 5, 2008

आभार

आपण जी माझी माहिती नेटवर पाहतो आहे याचे पूर्ण श्रेय खुशाल गोहिल यालाच जाते , जो माझा चांगला मित्र आहे। त्याबद्दल त्याचे शतश: आभार.

दिसतं तसं नसतं


फुलाच्या रंगावरून त्याचा सुगंध समजत नाही,
माणसाच्या दिसन्यावरून त्याचा स्वभाव समजत नाही .

Monday, June 2, 2008

आज

४.६.2००८
आज मालवणचे लाडू खाल्ले खूप मजा आली.