दोन टोकावरचे दोन पक्षी खुनावतात एकमेकांना
राघुमैनेचे गोडगुपित जणू सांगतात सर्वांना ।
इश्यार्र्यातून वाचा फूटते त्यांच्या गुप्त भावनांना,
मूक पक्ष्यांची भाषा समजते प्रेम वेड्या मनांना।
राघुमैनेचे गुपित सांगून दोन जीव येतात एकत्र,
मैत्रिचे धडे गातात सप्त सुरांतून सर्वत्र।
मोर बोले मोरनीला राघू मैना किती हुशार,
जाणते अजाणतेपणी करती प्रेमाचा भडिमार।
नवलापोटी पक्ष्याना वाटे अशी असावी जवानी,
कोकिलासुद्धा गोड-गोड गाई राघुमैनेचिच कहानी।
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment