Thursday, June 19, 2008

त्यातच सारं आलं.

तू मला नाही फसलीस
पण मागे फिरून हसलीस
त्यातच सारं आलं,


गजबजलेल्या गर्दीत

माझी नजर तुला शोधते,
दुरुनसुद्धा तू

माझी नजर रोखते
त्यातच सारं आलं,


नजरेस नजर देताना
उगाच घाबरायला होते
तू माझ्याकडे

चोरून चोरून पाहते
त्यातच सारं आलं,


क्षणभर तुझे आस्तित्व
तुही विसरतेस
मलाही आस्तित्वाची

जाणीव करून देतेस
त्यातच सारं आलं.

No comments: