
UID CARD हे असे असेल आणि सर्वाना ते सक्तीचे असेल . महाराष्ट्रात
"यु आय डी" अथवा "
आधार कार्ड " प्रत्येकाला दिले जाणार आहे. हे कार्ड बहु-उद्देशीय असून याचा उपयोग आर्थिक आणि सामाजिक कामासाठी होणार आहे. या कार्ड प्रकारात २ कार्ड असणार आहेत १.
सिटिझनशिप कार्ड आणि २.
नॉन सिटिझनशिप कार्ड. दोन्ही कार्डाचा रंग आणि आकार वेगवेगळा असणार आहे.
नॉन-
सिटिझनशिप कार्ड हे विदेशीयांना ठराविक काळापुरते द्यावे लागणार आहे.
हे कार्ड सर्वाना सक्तीचे असणार आहे. यासाठी नागरिकाला पालिकेने जाहिर केलेल्या केंद्रावर जावे लागणार आहे आणि तेथे
१. ओळखीचा
२. राहण्याच्या पत्त्याचा
३. जन्मदिनांकाचा
पुरावा द्यावा लागणार आहे.
केंद्रावर हे पेपर तपासून झाल्यावर नागरिकाच्या हाताच्या
दहाही बोटांचे ठसे घेतले जातील आणि
प्रत्येकाच्या डोळंयाचे स्कँनिंग केले जाईल.
या सर्व माहितीच्या आधारावर शासनाकडून १२ अंकी ओळख क्रमांक देण्यात येईल. हा क्रमांक प्रत्येकाला त्याच्या घरी पोस्ट टपालाने कळविण्यात येणार आहे.
या कार्ड साठी नागरिकाला कोणत्याही
प्रकारची "फी" भरावी लागणार नाही.