Thursday, February 13, 2014

माझा दादा

माझा दादा माझ्यासाठी आई-बाप होतो
दु:ख तो घेतो आणि मला सुख देतो.

मला शिकविण्यासाठी स्वत: आडानी राहतो
मला शाळेत पाठवतो आणि तो शेतमजूरीला जातो.

शेतावर जातानाही अनवाणी जातो
आणि मला मात्र, नवीन बूट आणून देतो.

फाटक्या कपड्यानी स्वत: सण साजरे करतो
माझ्या वाढदिवसाला मात्र, मला नवे कपड़े आणतो.

पाठीवर हात ठेऊन शिकायला प्रोत्साहन देतो
मोठा होऊन दाखव, असे निक्षुनही सांगतो.

दादाच्या कष्टाचे फळ मला द्यायचे आहे
माझ्या सकट दादालाही आनंदी ठेवायचे आहे.

No comments: