कुंकवाचा वापर फक्त देव्हारा
आणि मंदिरातच दिसतो आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.
शृंगार फक्त चित्रपटात दिसतोय आणि
प्रत्यक्षात शरीर रिकामे होते आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.
लाजणे, मुरडणे लुप्त होते आहे
नोकरी व्यवसायातही ती पुढाकार घेते आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.
विरोधाला न जुमानता
अन्यायाशी लढते आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.
समाजातील क्रूर शक्तीना
नाहीसे करण्यासाठी प्रयत्नशील आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment