Wednesday, May 21, 2014

मैफिल

यावर्षी पुन्हा एकदा मैफिल जमणार,
उन्हाळयाच्या सुट्टीत फैमिली गावी जाणार.
मग मित्रामध्ये चर्चा सुरू होणार,
पार्टीचे आयोजन कुणाच्या घरी होणार...

दरवर्षी नवीन बकरा शोधतात
अन सुट्टीदिवशी सर्वजण एकत्र येतात
प्रत्येक जण 2 पेग पर्यंत धाव घेतो
अन 4 पेग घेतल्याचा आव आणू लागतो

वर्षभर झोपलेला शेर अचानक जागा होतो
मी किती शहाणा यासाठी स्वत:च भाव खातो
उतरायला लागल्यावर आणखी 2 पेगची मागणी होते
आणि जेवणाची केलेली सोय उगाच फुकट जाते

प्रत्येकजण आवाक्याच्या बाहेर जाऊ लागतो
अन जास्त झाली म्हणून तिथेच लोटपोट होतो
जेवण फुकट जाते म्हणून शुद्धीतले ओरडतात
आणि आयुष्य वाया गेले म्हणून त्यातलेच काही रडतात

ज्याच्या घरी ही मैफिल जमते त्याची चढ़लेली उतरते
बदनामीच्या भीतीने त्याची जणू हौसच फिटते
एक एक करून सर्वाना तो सावरतो
पुन्हा पार्टीत न येण्याची शपथच तो घेतो...

तरी मित्राशिवाय त्यालाही राहवत नाही
पुन्हा एकदा उन्हाळयाच्या सुट्टीची वाट पाही....

No comments: