मंजु (एक माणूस)
आज त्या कॅन्टीनवाल्या “मंजू”ची आठवण झाली.
कारणही तसेच होते की,
बाजूलाच एक कॅन्टीनबॉय लेडीजशी वाद घालत होता.
मग ते दिवस आठवले.
मंजूच्या विचार आणि आचाराला
सलाम करावासा वाटतो.
त्याने कॅन्टीनबॉयना गुणकारी शिकवण देऊन
शिक्षणातही अग्रगण्य केले आहे.
दिवसा कॅन्टीन- रात्री शिक्षण हे त्यांचे गणित.
मंजु हा एक कॅन्टीनचालक असुनसुद्धा
न्यू इंडिया सेंटरला तो घरचा मेंबर वाटतो.
त्यातच त्याचे स्वादिष्ट पदार्थ,
30*40 मुलांची फौज आणि त्यांची कौतुकास्पद वागणुक.
त्याने केलेल्या संस्काराची परतफेड
ही मुले कशी करणार ? देवास ठाऊक.. .
मंजूच्या कॅन्टीनमधील
सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यायला
आजही लोक परत परत सेंटरला येतात.
मंजु, तुझ्या या कारकीर्दीला आणि संस्कृतीला
दुरावलेल्या आम्हा सर्वांचा मानाचा सलाम.
तुझ्या हातून पिढ्या घड़तायत
याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- कवी सुनील जगदाले (एक खादाड)
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment