लेकराची हाक
माझ्या लेकराची हाक
माझ्या कानी ऐकू आली
एका हाकेमंदी आई
तुझी वेड़ीपिसी झाली ।
काय लेकराचा थाट
सांगू कुणा-कुणापाशी
मोठा सायब होऊन
आला गावाच्या हो वेशी ।
मन तीळ तीळ तुट
ओठ बोलू लागलं
वाट पाहून लेकरा
माझं डोळ आटलं ।
ज्यानं तुला शिकवाया
शेत गहाण टाकलं
कर्जापोटी तुझ्या बानं
सारं जग हे सोडलं ।
सारं जग हे सोडलं ।।
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment