तुझी आठवण
तुझ्या असण्याने मला फरक पडत नव्हता
तुझ्या नसण्याने मला फरक पडतोय,
तुझ्या वाट्याचे घरकाम मला करावं लागतंय
म्हणून नव्हे तर
तुझ्या नसण्याच्या वियोगाने आज मी रडतोय...
तू खुश असशील माझ्याविना
की माझी किरकिर बंद झाली,
पण तुला कुठे माहित आहे
तुझ्या आठवणीने माझी आसवं बेधुंद झाली..
Chandrayaan 2
5 years ago
No comments:
Post a Comment