श्रावण आणि मोबाईल
श्रावणातल्या सरी येऊन मोबाईल माझा भिजेल का?
फेसबुक, व्हाट्सअप बंद होऊन मिडीया मला विसरेल का?
मोबाईल आले हातात सर्वांच्या ग्रंथ कुणी वाचेल का?
जुन्या आपल्या संस्कृतीला उजाळा कुणी देईल का ?
पिझ्झा, बर्गर च्या जमान्यात उपवास कुणी करेल का?
सोळा सोमवार व्रत नाही निदान श्रावणी सोमवार तरी होईल का?
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या धावत्या युगात क्षणभर कुणी थांबेल का?
श्रावण महिन्यातल्या भक्तीसाठी मोबाईल कुणी बंद ठेवेल का?
- सुनिल जगदाळे
No comments:
Post a Comment