Tuesday, March 26, 2013

एक मैत्रीण

एक मैत्रीण अशी असते
न बोलताही मनातले ओखुन जाते॥

आई ची जाणीव तिच्यात असते
मुलांची काजी ती आवर्जून घेते
पतीला ती परमेश्वर मानते
सासु-सासरे यांचीहि ती पूजा करते

माहेरी जायलाही ती विसरत नाही
तिकडे आईबाबांची तीच काजी घे   
नाती जपण्याची शिकवण देत राहते 
जबाबदारीने भविष्याशी हितगुज करते॥

एक मैत्रीण अशी असते
जी मैत्रीण असूनही बरेच काही असते
सर्वासाठी सर्व नाती जपते आणि
तरीही ती माझी मैत्रीण असते॥

एक मैत्रीण अशी असते
न बोलताही मनातले ओखुन जाते॥

म्हणून मैत्रीण ही मैत्रीणच’ असते ॥ 

Monday, March 25, 2013

खूप खूप शुभेछा.....

तुझ्यावर कुणाचीही सत्ता नव्हती
तुझीच इतरांवर सत्ता होती
हे अनुभवाने तू सांगत होती
कामांतून तू ते दाखवत होती.

काहीतरी नवीन करण्याची
तुझी इच्छाशक्ति असते 
तुझी ती धडपड इतरासाठी
नेहमीच आठवणीत सते.
 
तू विसर सर्वाना पण
विसरु नको न्यू इण्डियाला
आयुष्यात घेतली अझुन उड्डाणे जरी  
दुरुन हाक दे आम्हाला.........

आमच्यासाठी तुझी मैत्री
दुर्मी होणार आहे
पण आनंदाचे मनोरे अझुन
तुही फुलवणार आहे

तुझी मैत्री हवीहवीशी वाटते
काही क्षणासाठी नाही तर
अनंतका असावीशी वाटते
म्हणून निरोप घेता अन्तर्मनही दाटते
 
उत्तरोत्तर प्रगति होवों, हीच आमची सदिच्छा
पुढील आयुष्यासाठी, खूप खूप शुभेछा.....

Wednesday, February 13, 2013

रात्र व्हावी असं मला मुळीच वाटत नाही


क्षणभराच्या  विश्रांतीसाठी
रात्रभर आपण झोपतो
जाग आल्यावर मात्र
नशिबावर कोपतो .

काहीतरी करून दाखवण्याची
इच्छा असते भरपूर
पण आळसापोटी मात्र
नुसतीच जीवाला हुरहुर .

आज इथे, उदया तिथे
रोजच अनुभवाचे धड़े गिरवत असतो
काहीतरी नवीन शिकण्याच्या
आनंदाने मिरवत असतो .

रात्र झाली की पावलं पुन्हा घराकडे वळतात
दिवसा रंगवलेली स्वप्नेसुध्दा मग दूरदूर पळतात .

निराशाही माझ्याशी आता बोलत नाही
म्हणून रात्र व्हावी असं मला मुळीच वाटत नाही .  
 

“आई”


अन जाणीव झाली आई तू भेटल्याची
तू सोबत नसूनही सोबत असल्याची
रात्री झोपताना तू थोपटल्याची
अंगाई गीत गात असल्याची । । अन जाणीव .......
झोपेत मला कुशीत घेतल्याची
अंगावर पदर टाकून झोपवल्याची
सकाळी उठवताना प्रेमाने मारलेल्या हाकेची
शाळेत जाताना विरहाची अन परत आल्यावरच्या भेटीची । । अन जाणीव .......

बानं बदडल्यावरच्या तुझ्या मिठीची
अन शांत करणारया तुझ्या सांत्वनाची
स्वप्नात पाहिलं तुला मी
अन जाणीव झाली आई तू भेटल्याची । । अन जाणीव ......
जागा होऊन पाहतो तर उशी सरकल्याची, अंथरून विस्कटल्याची
अन तरीही जाणीव झाली आई तू भेटल्याची.......... 

-सुनिल जगदाळे

Thursday, February 7, 2013

आई बाबा

आई बाबा माझे आहेत
मी त्यांचा नाही
ते मला विसरु शकतील
मी विसरणार नाही

मी त्यांचा असेन तर
मलाही भान ठेवायला पाहिजे
की  माझे इतर कुणीही असले तरी
मी आईबाबा सोबत जगायला पाहिजे 

मी आयुष्य जगताना
माझेकडे सर्व काही असेल
पण आईबाबा नसतील तर
आभाळहि ठेंगणे दिसेल

आईला नको पैसा आडका
बाबांनाही नको तुमची संपत्ती
त्यांना फक्त तुम्हाला हसताना पहायचय
तीच खरी त्यांची प्रगति आणि इच्छाशक्ति.

म्हणून आई बाबाना विसरु नका ....
आई बाबाना विसरु नका ....     

वंशाचा दिवा

का हवा असतो मुलगा सर्वाना ?
वंशाचा दिवा म्हणून पोसण्यासाठी ?

का सोसवेत त्रास मुलीने ?
मुलगी आहे म्हणून की सासरी जाण्यासाठी ?

काय दिवे लावतो हा मुलगा ?
गरीब असो वा श्रीमंतासाठी

पैशाची उधळण, व्यसनांचा कळस
मुलांमध्ये असतो जन्मभराचा आळस 

वंशाचा दिवा म्हणून लाडावलेला
प्रेमात आणि व्यसनात आयुष्यभर बुडालेला

ठेवा मुलीवरही विश्वास भविष्यासाठी
नका करू अट्टाहास वंशाचा दिवा असण्यासाठी .     

आई , घेऊ दे ना जन्म तुझ्यापोटी

आई, माझा त्रागा करणार नाहीस ना ?
काय बिघडलं , मी मुलगी आहे म्हणून ?

आई, मला घेऊ देशील ना शिक्षण ?
दोन्ही घरचा दिवा लावण्यासाठी

आई, मलाही देशील ना परवानगी ?
आकाशात उंच भरारी घेण्यासाठी

आई, मलाही जगु देशील ना स्वछंदाने ?
माझे आस्तित्व जपण्यासाठी

आई, मलाही करू देशील ना कष्ट ?
जगाच्या कल्याणासाठी

आई, तू पण स्त्रीच आहेस ना गं ..........
तुही जगतेस ना इतरांसाठी ..........

आई, मलाही घेऊ दे ना जन्म तुझ्यापोटी ?
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी ..........       

तू

तू सोबत होतीस
कुणाचीच गरज भासत नव्हती
तुझ्यावाचून सगळ्याचीच
उणीव भासत होती

तुझ्याशी संवाद केल्याविना
दिवस आनंदी जात नव्हता
आता मात्र इतरांशी
वाद घालण्यात दिवस जात होता  

तुझे सोबत नसणे
आयुष्यच नसल्या सारखे झाले आहे
तुझ्यावाचून जगणे म्हणजे
नजरेवाचून डोळे असल्या सारखे झाले आहे

तुझ्या आठवणी लिहायला
शब्द पुरणार नाहीत
तुझी सोबत असल्यावर
आठवणीच उरणार नाहीत

तुही जग , तुझ्यासोबत मलाही जगु दे
आयुष्य एकदाच मिळते ते तुझ्यासोबत घालवू दे .

 

Friday, January 18, 2013

“तो” आणि “ती”


तो Computer

ती File

तो  Program

ती System

तो Wallpapers

ती Image

तो  CD/DVD Writer

ती CD/DVD

तो  CPU, Monitor, Mouse, Keyboard

ती Cable-wire जी या सर्वाना जोडते,

या “तो” आणि “ती” पासून जे तयार होते

ते Letter, ते Print , ते Matter, ते Description.