अन जाणीव झाली आई तू भेटल्याची
तू सोबत नसूनही सोबत असल्याची
रात्री झोपताना तू थोपटल्याची
अंगाई गीत गात असल्याची । । अन जाणीव .......
झोपेत मला कुशीत घेतल्याचीतू सोबत नसूनही सोबत असल्याची
रात्री झोपताना तू थोपटल्याची
अंगाई गीत गात असल्याची । । अन जाणीव .......
अंगावर पदर टाकून झोपवल्याची
सकाळी उठवताना प्रेमाने मारलेल्या हाकेची
शाळेत जाताना विरहाची अन परत आल्यावरच्या भेटीची । । अन जाणीव .......
बानं बदडल्यावरच्या तुझ्या मिठीची
अन शांत करणारया तुझ्या सांत्वनाची
स्वप्नात पाहिलं तुला मी
अन जाणीव झाली आई तू भेटल्याची । । अन जाणीव ......
जागा होऊन पाहतो तर उशी सरकल्याची, अंथरून
विस्कटल्याचीअन शांत करणारया तुझ्या सांत्वनाची
स्वप्नात पाहिलं तुला मी
अन जाणीव झाली आई तू भेटल्याची । । अन जाणीव ......
अन तरीही जाणीव झाली आई तू भेटल्याची..........
-सुनिल जगदाळे
No comments:
Post a Comment