आई, माझा त्रागा करणार नाहीस ना ?
काय बिघडलं , मी मुलगी आहे म्हणून ?
आई, मला घेऊ देशील ना शिक्षण ?
दोन्ही घरचा दिवा लावण्यासाठी
आई, मलाही देशील ना परवानगी ?
आकाशात उंच भरारी घेण्यासाठी
आई, मलाही जगु देशील ना स्वछंदाने ?
माझे आस्तित्व जपण्यासाठी
आई, मलाही करू देशील ना कष्ट ?
जगाच्या कल्याणासाठी
आई, तू पण स्त्रीच आहेस ना गं ..........
तुही जगतेस ना इतरांसाठी ..........
आई, मलाही घेऊ दे ना जन्म तुझ्यापोटी ?
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी ..........
काय बिघडलं , मी मुलगी आहे म्हणून ?
आई, मला घेऊ देशील ना शिक्षण ?
दोन्ही घरचा दिवा लावण्यासाठी
आई, मलाही देशील ना परवानगी ?
आकाशात उंच भरारी घेण्यासाठी
आई, मलाही जगु देशील ना स्वछंदाने ?
माझे आस्तित्व जपण्यासाठी
आई, मलाही करू देशील ना कष्ट ?
जगाच्या कल्याणासाठी
आई, तू पण स्त्रीच आहेस ना गं ..........
तुही जगतेस ना इतरांसाठी ..........
आई, मलाही घेऊ दे ना जन्म तुझ्यापोटी ?
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी ..........
No comments:
Post a Comment