क्षणभराच्या विश्रांतीसाठी
रात्रभर आपण झोपतो
जाग आल्यावर मात्र
नशिबावर कोपतो .
काहीतरी करून दाखवण्याची
इच्छा असते भरपूर
पण आळसापोटी मात्र
नुसतीच जीवाला हुरहुर .
आज इथे, उदया तिथे
रोजच अनुभवाचे धड़े गिरवत असतो
काहीतरी नवीन शिकण्याच्या
आनंदाने मिरवत असतो .
रात्र झाली की पावलं पुन्हा घराकडे वळतात
दिवसा रंगवलेली स्वप्नेसुध्दा मग दूरदूर पळतात .
निराशाही माझ्याशी आता बोलत नाही
म्हणून रात्र व्हावी असं मला मुळीच वाटत नाही .