Wednesday, September 17, 2008

मेल्यावरचे सुख

जिवंतपणी ज्याच्यावर हसत असतात त्यासाठीच नंतर रडताना दिसतात।
जिवंतपणी किम्मत देत नाही नंतर मात्र गुणगान गाई।

जिवंतपणी शिव्यांचा भडिमार नंतर मात्र कौतुकांचा सागर।
जिवंतपणी थंड पाणी नहायला नंतर मात्र गरमागरम भाजायला।

जिवंतपणी राग राग करतात नंतर मात्र पदराने वारा घालतात।
जिवंतपणी मी तुमचा कोणीही नाही नंतर मात्र मीच एकुलता वारस राही।

No comments: