Thursday, September 18, 2008

विचार कसे असावेत ???

राजवाडयाच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडेसुद्धा लोक कौतुकाने पाहतात।

लहानपणीच्या आठवणी किती नाजुक, मोहक, बहुरंगी असतात जणू काही मोरपिसेच।

मूल कितीही मोठे झाले तरी आईसाठी ते लहानच असते।

आयुष्याच्या आरंभी ज्यात अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी वाटू लागते।

शब्दापेक्षा स्पर्श बोलका असतो पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नही ते काम अश्रुनाच साधते ।

आई वडिलांची दू:खे मुलांना कधीच कळत नाहीत।

कळी सदैव कळी राहू शकत नाही आज ना उद्या तिला फुलावेच लागते, मोठे व्हावेच लागते।

हे जग माणसाच्या दयेवर चालत नाही।

पुरुषांचा जन्म पराक्रमासाठीच असतो।

माणुस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही प्रसंगी ते त्याचेच वैर साधते।

ज्याला जगायचं आहे त्यानं जिथं मृत्यु स्वच्छंदे क्रीडा करीत असतो तिथं कशाला जावं।

- उज्वला जगदाळे

No comments: