Monday, September 22, 2008

मी लहान होतो तेव्हा.....

मी लहान होतो तेव्हा.....
सायकलसाठी रडत होतो ।
आजची मुले बाईकसाठी भांडत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
झाडाच्या पानाची पिपानी वाजवत होतो .
आजची मुले ओर्गन, बेन्जो वाजवत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
गोटया, सुरफाटया खेळत होतो .
आजची मुले कँरम, क्रिकेट खेळत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
आईला "आई" म्हणत होतो .
आजची मुले ममा म्हणत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
आईच्या कुशीत झोपयाचो.
आजची मुले प्रेयसीची कुशी शोधताहेत.

No comments: