आई वडिलांना विसरु नका।
क्षणभर दुसरं काही विसरा
पण आई वडिलांना विसरु नका ।
ज्यांनी तुमच्या मार्गात फुले पसरली,
त्यांच्या मार्गातील काटे तुम्ही बनू नका ।
ज्यांनी तुमचे कोड-कौतुक केले ,
त्यांचे ह्रदय कधी दुखवू नका ।
ज्यांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या,
त्या पूज्य माता-पित्यांना विसरु नका ।
ज्यांनी तुम्हाला दुग्धामृत पाजून संजीवन दिले,
त्यांची मने दुखवू नका ।
ज्यांनी तुम्हाला जन्म दिला,
त्यांना तुम्ही आजन्म विसरु नका ।
ज्यांनी तुमच्यावर लाखो खर्च केले,
त्यांच्या उपकाराची फेड करता येत नाही ।
त्यांचे लाख, तुमच्यासाठी केवळ राख आहे ।
Chandrayaan 2
5 years ago
1 comment:
Good, now you are standard is improving,
khushal
Post a Comment