Wednesday, December 10, 2014

जाऊ दे शाळेला


आई मला जाऊ दे शाळेला
दोन चार अक्षर शिकायला ।।धृ।।

शाळेत मी जाईन, फौजदार होईन
गुंड, चोरांना पकडून देईन
सरकार कडून बक्षीसे मिळवायला...

शाळेत मी जाईन, डॉक्टर होईन
पेशंट लोकाना, इंजेक्शन करीन
आजारातून वाचवायला ...

शाळेत मी जाईन, शिक्षक होईन
चुका करणा-याना शिक्षा देईन
आदर्श घड़वायला...

शाळेत जाईन, माणूस होईन
सर्व समाजाला प्रगतिकड़े नेईन
विकास करायला ...

शाळेची आवड


आवड मला शाळेची शाळेत जायचं, शाळा शिकुनी मोठं व्हायचं
शेजारचा हा पिंटया मजला लागलाय बोलवायला
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या. ।।धृ।।

शाळेतली पोरं लय लय गुणी, शाळेत म्हणतात पिक्चरची गाणी
एकजुटीने, गोळा होऊन, गोष्टी सांगायला......लागले गोष्टी सांगायला,…
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या. ।।१।।

शाळेत पिंटयाचा रोजचा धिंगाना, पिक्चरमुळे हा झाला दिवाना
दादागिरी करून, इतरांना मारून, भाई हा बनायला....लागला भाई हा बनायला....
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या. ।।२।।

पिंटयाच्या मनात वेगळच आलं, एकाएकी डोळयात पाणी आलं
अभ्यास करून, नंबर काढून, नाव हयो कमवायला..... लागला नाव हयो कमवायला
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या.
चला चला रे जाऊ या, शाळा शिकायला जाऊ या...

Monday, December 1, 2014

“ मैं नहीं हम”


हमने अपने आपको “ हम ” कहाँ
“ मैं “ कहने की हिम्मत नहीं हुई....
क्योंकी हमने सुना है “ मैं “ इंसान को खा जाता है
इंसान जो कुछ भी बनता है
वो “ मैं “ छिन लेता है

इसलिए हम कहना ही ठीक है
“हम” मे तो और भी सहकारी आ जाते है
जो आपको कुछ बनाने के लिए मददगार होते है
हम उनका शुक्रिया अदा तो कर ही देंगे
फिर भी उन्हे इस “ हम “ मे समाने की दावत देंगे

और इसलिए हमें यहाँ तक आने मे जिनकी
सहायता मिली उनके नाम, हमारा ये सम्मान....

धन्यवाद.

Monday, November 3, 2014

तू अशी, तू कशी ?

तू अशी, तू कशी ?
तुझ्या विश्वात तुच रहाशी.

तुझं चालणं, मूंग्याना जागा देणारं
तुझं बोलणं, ओठांना त्रास न होणारं

तुझं राहाणं, नेहमीच साधेपणाचं
तुझं वागणं, विना त्रासाचं

तुझं रागावणं, सर्वांना हसवणारं
तुझं चिडणं, सर्वांना गुंतवणारं

तुझा आनंद तुझ्यात,
तरीही माझ्यात आणि सर्वांच्यात.

ती बोलली


स्वप्नात प्रेयसी माझ्याशी बोलली,
आणि बायको समोर तिने माझी पोल खोलली.

तो असा तो तसा सांगता सांगता,
तिने बायकोशी मैत्री केली.

झाले गेले विसरून जा असे सांगत,
तिने बायकोला भड़कवून दिली.

बायकोचा चेहरा पाहून,
मी केविलवाना झालो.

बादलीभर पाणी पडले अंगावर
तेंव्हा कुठे भानावर आलो.

60 (साठी)


लोकांची मने ओळखून,
जिंकलंत तुम्ही सर्वाना.
विरह सहन होत नाही,
निरोप तुमचा घेताना.

आपण ओळखता, मने सर्वांची
आपण जाणता, मर्यादा मनाची.
तुम्ही आहात ज्ञानाची मूर्ति,
मी काय वर्णावी तुमची किर्ति.

आपले वक्तव्य, मनी छाप पाडते
एकदा गोड बोललात, तीच मैत्री भासते.
आपले स्नेहाचे बोलणे, सर्वांनाच आनंद देते
विनोदी स्वभावांनी, सर्वांचे मन जिंकुन घेते.

उदण्ड आयुष्य लाभों तुम्हा, हीच आमची सदिच्छा,
निवृत्ति नंतरच्या जीवनाला हार्दिक शुभेच्छा.
-सुनिल जगदाळे

Thursday, October 9, 2014

खुर्चीमागे दड्लय काय?


देशाचा विकास, सर्व काही झकास,
नाहीतर भकास, दुसरं काय?

नेत्यांची दिवाळी, नोटांची होळी,
तुमचे आमचे हाल, दुसरं काय?

सत्तेची नशा, मतदाराची दुर्दशा,
डोक्याला ताप, दुसरं काय?

राज्याचे राजकारण, समाजाचे तारण,
खुर्ची बोलणार, दुसरं काय?

खुर्चीसाठी चढ़ाओढ़, नात्यामध्येच घोडदौड़,
टिकास्त्र सोडणार, दुसरं काय?

स्वप्नांची पुर्ती, नावाची किर्ती,
करोड़ोंचे घोटाळे, दुसरं काय?

लोकांची सेवा, निमित्त ठेवा,
सरकारी मेवा, दुसरं काय?

खुर्चीसाठी घुसमट, निवडणुकीने दमछाक,
मतदारांना हाक, दुसरं काय?

Monday, August 4, 2014

लय भारी- माऊली माऊली

गायक: लीला कणसे, बाळ पडसूळे
संगीत दिग्दर्शक: अजय-अतुल

विठ्ठल विठ्ठल -7
तुला साद आली, तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा, घेतला पावलानी, अगा वाळवंटी तुझी सावली
गळा भेट घेण्या, वीणेची निघाली, तुझ्या नामघोषात इंद्रायणी
विठ्ठल विठ्ठल -8

हो... भिड़े आसमंती, ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली?
जरी बाप सा-या जगाचा, परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली- 6 रूप तुझे ---2
विठ्ठल विठ्ठल -8

चालतोरे तुझी, वाट रात्रंदिनी, घेतला पावलानी वसा
टाळ घोष्यातुनी, साद येते तुझी, दावते वैष्णवाना दिशा
दाटला मेघ तू सावळा,
मस्तकी चंदनाचा टिळा
लेवुनी तुळशी माळा गळा या,
दावशी वाट त्या राउळा

हा... आज हरपल देहभान, जीव झाला खुळा बावरा
राहण्या ग तुझ्या लोचनात, भाबड्या लेकरांचा लळा
भिड़े आसमंती ध्वज वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली?
जरी बाप सा-या जगाचा, परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली- 6 रूप तुझे ---2
विठ्ठल विठ्ठल -11

चालला गजर, जाहलों अधिर, लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन, आता घालीन, पांडुरंगाला
देखिला कळस, डोईला तुळस, दावितों चंद्रभागेशी
समीपही दिसे पंढ़री, याच मंदिरी, माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत या, माऊली तुझ्या, पायरी ठेवतो माथा..
माऊली माऊली- 6

पुंडलीक वरदे हारिविठ्ठल श्री... ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय..........

Thursday, July 3, 2014

एक बूँद


एक बूँद शराब की ऐसा मजा चखाती है
बसा-बसाया घर-संसार सब उजाड़ देती हैं

शुरुआत एक ही बूँद से होती है, अंजाम बोतलों तक पहुंचता हैं
और हर पल की खुशी का अंजाम गमों में बदल जाता हैं

नशे में वो इतना डूब जाता है कि शराब के लिए घर ही बेच देता है
बसा-बसाया घर उजड़ जाता है फिर भी वो शराब नहीं छोड़ता है

वक्त


वक्त ठहरता नहीं, बदलता हैं
एक चायवाले का सपना पूरा हो जाता है.

वक्त को वक्त नहीं हैं
वक्त क्या है देखने के लिए.

हमें जानना हैं, वक्त क्या हैं
खुदकों बदलने के लिए

वक्त वक्त की बात हैं
संभल जाना है, खुदको संवारना है.

वक्त आपके लिए नहीं बदलेगा
आपको वक्त के साथ बदलना हैं.

Thursday, May 22, 2014

न जाने क्यूं

जीने की चाहत तो हर किसी को हैं
ऐसेही कोई मरना नहीं चाहता हैं

खुशी से हो उसका दामन भरा
फिर भी वो, हर खुशी जीना चाहता हैं

एक पल हँसता, एक पल में रोता हैं
खुशी को पल में भूल के दु:खो का दिंडोरा पीटता हैं

हर दु:ख मे भगवान पे ही इल्जाम लगा देता हैं
न जाने आखिर क्यूं, हर इंसान एक जैसाही होता हैं



Wednesday, May 21, 2014

मैफिल

यावर्षी पुन्हा एकदा मैफिल जमणार,
उन्हाळयाच्या सुट्टीत फैमिली गावी जाणार.
मग मित्रामध्ये चर्चा सुरू होणार,
पार्टीचे आयोजन कुणाच्या घरी होणार...

दरवर्षी नवीन बकरा शोधतात
अन सुट्टीदिवशी सर्वजण एकत्र येतात
प्रत्येक जण 2 पेग पर्यंत धाव घेतो
अन 4 पेग घेतल्याचा आव आणू लागतो

वर्षभर झोपलेला शेर अचानक जागा होतो
मी किती शहाणा यासाठी स्वत:च भाव खातो
उतरायला लागल्यावर आणखी 2 पेगची मागणी होते
आणि जेवणाची केलेली सोय उगाच फुकट जाते

प्रत्येकजण आवाक्याच्या बाहेर जाऊ लागतो
अन जास्त झाली म्हणून तिथेच लोटपोट होतो
जेवण फुकट जाते म्हणून शुद्धीतले ओरडतात
आणि आयुष्य वाया गेले म्हणून त्यातलेच काही रडतात

ज्याच्या घरी ही मैफिल जमते त्याची चढ़लेली उतरते
बदनामीच्या भीतीने त्याची जणू हौसच फिटते
एक एक करून सर्वाना तो सावरतो
पुन्हा पार्टीत न येण्याची शपथच तो घेतो...

तरी मित्राशिवाय त्यालाही राहवत नाही
पुन्हा एकदा उन्हाळयाच्या सुट्टीची वाट पाही....

Monday, May 5, 2014

हिम्मत

स्वप्नांच्या पलिकडे पाहून काहीतरी करणे,
ही हिम्मत असते.

समाजाची बंधने तोडून काहीतरी मिळवणे,
ही हिम्मत असते.

कुणालाही न जुमानता आपली उद्धिष्ट पूर्ण करणे,
ही हिम्मत असते.

निर्णय कोणताही असो तो स्वीकारणे,
ही हिम्मत असते.

सतत काहीतरी वेगळं करायला प्रवृत्त होणे,
ही हिम्मत असते.

हिम्मत असेल तर स्वत:चे अस्तित्व निर्माण करू शकाल,

नाहीतर भीतीपोटी स्वत:च्या ओळखीलासुद्धा मुकाल.

Friday, March 21, 2014

खुश हूँ


तू नहीं तो तेरी यादों में खुश हूँ

तू साथ है,तो तेरी बातों में खुश हूँ.

मेरी हर खुशी की शुरुआत तुम हो

मेरे हर गम की दवा भी तुम हो.



दिन मे नहीं तो रातों में खुश हूँ

सच्चाई से दूर, सपनों में खुश हूँ.

मेरी चाहत का अंदाज़ तुम हो

मेरी नफरत के जज़बात तुम हो.



मन से नहीं तो दिल से खुश हूँ

तू नहीं तो, तेरी दिवानगी से खुश हूँ.

मेरे बिछड़े यादों का पैगाम तुम हो

मेरे तरसते प्यार का अंजाम तुम हो.



दवा से नहीं तो दुआ से खुश हूँ.

तुझे पाने की हर ख्वाईश से खुश हूँ .....

Wednesday, March 5, 2014

आजची स्त्री बदलते आहे

कुंकवाचा वापर फक्त देव्हारा
आणि मंदिरातच दिसतो आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.

शृंगार फक्त चित्रपटात दिसतोय आणि
प्रत्यक्षात शरीर रिकामे होते आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.

लाजणे, मुरडणे लुप्त होते आहे
नोकरी व्यवसायातही ती पुढाकार घेते आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.

विरोधाला न जुमानता
अन्यायाशी लढते आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.

समाजातील क्रूर शक्तीना
नाहीसे करण्यासाठी प्रयत्नशील आहे
कारण आजची स्त्री बदलते आहे.

Thursday, February 13, 2014

माझा दादा

माझा दादा माझ्यासाठी आई-बाप होतो
दु:ख तो घेतो आणि मला सुख देतो.

मला शिकविण्यासाठी स्वत: आडानी राहतो
मला शाळेत पाठवतो आणि तो शेतमजूरीला जातो.

शेतावर जातानाही अनवाणी जातो
आणि मला मात्र, नवीन बूट आणून देतो.

फाटक्या कपड्यानी स्वत: सण साजरे करतो
माझ्या वाढदिवसाला मात्र, मला नवे कपड़े आणतो.

पाठीवर हात ठेऊन शिकायला प्रोत्साहन देतो
मोठा होऊन दाखव, असे निक्षुनही सांगतो.

दादाच्या कष्टाचे फळ मला द्यायचे आहे
माझ्या सकट दादालाही आनंदी ठेवायचे आहे.

ऋतु हिरवा

ऋतु हिरवा तहानलेला,
पहिल्या पावसाने सुखावलेला
अन शांत निजलेला.

ऋतु हिरवा फुललेला,
जणू गालीचा पसरलेला
अन झुल्यावाचून झुललेला.

ऋतु हिरवा आसमंतातला,
कधी उन्हात थिजलेला
तर कधी पावसात भिजलेला.

ऋतु हिरवा गर्द झाडीतला,
श्रीमंतांच्या माड़ीतला
अन गरीबांच्या वाडीतला.