Wednesday, December 31, 2008

मेरे फोटोज

http://picasaweb.google.com/suniljagdales/Sunil#slideshow

नविन वर्ष

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्या आकांक्षांचे

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्या संकल्पांचे

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्यातल्या सदगुणांचे,

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्यातल्या स्वप्नांचे,

नविन वर्ष कुणाचे
माझे आणि माझ्या उज्ज्वल भविष्याचे,

नविन वर्ष कुणाचे
फक्त माझे आणि माझेच.

Wednesday, December 17, 2008

का असं वागतेस

मला पाहुनसुध्दा न पाहिल्यासारखं करतेस,
तू का असं वागतेस ?

फोनवरून गप्पा करतेस आणि भेटल्यावर अबोली होतेस,
तू का असं वागतेस ?

भेटीला बोलविले तर तूच उशिरा येतेस
आणि मला वाट पहायला लावतेस,
तू का असं वागतेस ?

माझ्या बावळटपणांवर मात्र खुदकन हसतेस
आणि मी हसलो तर लगेच रागवतेस,
तू का असं वागतेस ?

माझे गुणदोष दोन्ही मान्य करतेस
आणि तुझे गुणदोष मात्र तू लपवतेस,
तू का असं वागतेस ?

'प्रेम' माझ्यावर करतेस आणि
तेहि तू तुझ्या नखयातून दाखवतेस,
तू का असं वागतेस ?

Tuesday, December 16, 2008

घाई

माझी आपली नेहमीचीच घाई,
सगळे काही बदलले तरी ती बदलायची नाही।

लिप्टची वाट पाहणं मला आवडत नाही,
कारण तीही माझ्यासारखी धावत नाही,
माझी आपली नेहमीचीच घाई।

ऑफिसच्या वेळी मी गडबडीत दिसते,
टेबलावर कामाची उतरंड लागलेली असते,
कामाच्या वेळी मी स्वत:लाही विसरून जाई,
माझी आपली नेहमीचीच घाई।

क्षणभर विसाव्याला वेळ मिळत नाही,
एका पाठोपाठ एक काम करत राही,
माझी आपली नेहमीचीच घाई।

Friday, December 12, 2008

तू एकदा सांगुन तर बघ

तुला काय हवे आहे, हे मला कसे समजणार ?
त्यासाठी तू एकदा सांगुन तर बघ।

तुझ्याविना माझे जीवन अधूरे आहे,
जीवनसाथ देण्यासाठी तू एकदा सांगुन तर बघ.

आनंदातच नाही तर दू:खातही,
तुझ्यासोबत राहीन तू एकदा सांगुन तर बघ.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही त्यासाठी,
विश्वास ठेवून तू एकदा सांगुन तर बघ.

चंन्द्र, तारे तोडायला तुला सांगणार नाही,
चांदणे पहायला सोबत येईन तू एकदा सांगुन तर बघ.

एक जन्माचीच नाही तर साताजन्माची साथ देईन,
त्यासाठी तू एकदा सांगुन तर बघ.

Tuesday, November 18, 2008

सुविचार


२१. एखादी गोष्ट स्वत:ला ठीक वाटली तर जरूर करावी, इतरांमुळे कदाचित त्या गोष्टीचे मिळणारे समाधान आपण गमावून बसतो।

२०. शरीरास सहन होईल तितकेच परिश्रम करावे अन्यथा शरीर कमजोर होऊन जीवन जगणे कठीण होईल.

१९. इतरांबरोबर वावरताना "मी " कुणीतरी आहे असा थोड़ा जरी अहंभाव मनात आला तरी तुमची किंमत शुन्य होऊ शकते।

१८. उपाशीपोटी माणूस भांडण करतो आणि भरल्यापोटी विचार करतो म्हणून कोणताही विचार करायचा असेल तर पोट भरलेले असले पाहिजे।

१७.क्षणभरही विचार करायला वेळ नसणाया व्यक्तिंना स्वप्ने कशी पडणार ?

१६.आपल्याशी सर्वांनी चांगले वागावे असे वाटत असेल तर प्रथम आपण सर्वांशी चांगले वागले पाहिजे.

15.इतरांचे सुख पाहून दू:खी होणारास कधीच सुख प्राप्त होत नाही.

14.क्षणभरासाठी का होईना ज्याच्यावर तुमचा सद्र्ढ विश्वास आहे त्याला स्मरा व स्वत:ला क्षणभर विसरा आनंद द्विगुणित होईल।

13.सत्कार्याची भावना आपल्याला प्रगतीकडे नेते तर दुश्क्रुत्याची अधोगतिकडे.

12.एखाद्या व्यक्तीतील एखादाच चांगला गुण आपल्याला भावून जातो म्हणून तो आपल्या मते श्रेष्ठ ठरतो।

11.गोड बोलण्याने फायदा होत नसेल परंतु तोटासुद्धा होत नाहीच ना ? मग गोड, चांगले का बोलू नये।

10.आपल्यामध्ये कोणते दोष आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या “जिवलग” व्यक्तीस विश्वासात घेउन विचारा।

9.समोरची व्यक्ति बोलताना त्याच्या हावभावीकडे लक्ष दिले तर त्याचा विषय तुम्हाला लवकर समजेल।

8.तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणीही तुम्हाला सुखी बनवू शकत नाही त्यासाठी तुम्ही सुख मानायला शिकले पाहिजे।

7.इतरांचे सकारात्मक लक्ष्य अपल्याकडे वेधून घ्यायचे असेल तर आपल्या अंगी आदर्शवादी गुण असायला हवेत ।

6.आपणास आलेले वाईट अनुभवही आपण इतरांना सांगू शकतो कारण त्यातुनही त्यांना चांगले शिकता येईल ।

5.सोंगाडया प्रत्येक गोष्टीचे सोंग करू शकतो परन्तु परिस्थितीचे नाही
कारण परिस्थिती आस्तित्वात असते।

4.सुखाचा एक क्षण अनुभविण्यासाठी दु:खाचा डोंगर पार करावा लागतो।

3.आपण इतरांच्या चुका काढत असाल तर त्या चुका आपल्या हातून होणार नाहीत याची दक्षता घ्यायलाच हवी.

2.आपल्या गुणदोषांसहित जो आपल्यावर प्रेम करतो तोच आपल्याबरोबर दीर्घकाल टीकू शकतो.

1.इतरांचे चांगले गुण आपण चोरी जरी केले तरी कोणताही पोलिस आपणास पकडू शकणार नाही।

Monday, October 27, 2008

शुभेच्छा


नववर्षाचा संकल्प धरु
दुर्गुणांचा सर्वनाश करू ।
सदगुणांच्या संगतीत
अवघे जीवन उज्ज्वल करू । ।
दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Tuesday, October 7, 2008

पहिलं प्रेम

पहिल्या प्रेमाची, पहिली कथा
शब्दही मिळत नाहीत, ही प्रेमाची व्यथा ।
पहिलं प्रेम सर्वांनाच भावून जातं
स्वप्नांच्या देशात स्वत:लाही नेतं ।

रात्रीचा दिवस करून तो तिची वाट पाहतो
एक एक क्षण त्याला वर्षासारखा जातो ।
एकवेळी त्याला वाटतं, सांगुन टाकावं एकदाचं की,
माझं तुझ्यावर प्रेम आहे
क्षणभरात विचार बदलतो अन् सांगतो,
तुझं माझं जीवन किती सेम आहे !

प्रेयसी चलाख त्याची बेचैनी ओळखुन जाते
तरीही काही बोलत नाही, तीही त्याचीच वाट पाहते ।
भेटताना प्रत्येकवेळी तो विचार करतो भविष्याचा
प्रत्यक्ष भेटल्यावर मात्र त्याला विसर पडतो आयुष्याचा।

पहिल्या प्रेमाच्या वेळी प्रियकर असतो प्रेमवेडा
प्रेमात पडल्यावर त्यालाही रोज मिळतो धडा ।
प्रेमासाठी वाट्टेल ते करायला नेहमीच तयार
लग्नानंतर म्हणतो मात्र, जाऊ दे ना यार ।

Monday, September 29, 2008

मेरा वो

बहूत किया इंतजार, अब आई है बहार ।

जिसके लिए थी बेकरार, खुशियाँ लाया वो बेशुमार ।

उसके आने की रोनक, सारे जहाँ से दिख रही थी ।

उसे क्या मालुम, मै कितनी खुश हो रही थी ।

उसने आते हीं, थामा मेरा हाथ ।

जैसे बोल रहा था, है जनम-जनम का साथ ।

हर पल हर घड़ी, मै उसे चाहती हूँ ।

जहाँ जाऊँ वहां, उसके साथ रहती हूँ ।

एक दिन मुझे, अजबसा सपना आया ।

सपने में उसने, मेरा साथ छोड़ दिया ।

जिंदगी में आके मेरे, उसने मुझे छेड़ा था ।

मेरे दिल का चहेता, मेरा चाइना मोबाईल मेरे पासही पड़ा था ।



Tuesday, September 23, 2008

आई वडिल

आई वडिलांना विसरु नका।

क्षणभर दुसरं काही विसरा
पण आई वडिलांना विसरु नका ।

ज्यांनी तुमच्या मार्गात फुले पसरली,
त्यांच्या मार्गातील काटे तुम्ही बनू नका ।

ज्यांनी तुमचे कोड-कौतुक केले ,
त्यांचे ह्रदय कधी दुखवू नका ।

ज्यांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या,
त्या पूज्य माता-पित्यांना विसरु नका ।

ज्यांनी तुम्हाला दुग्धामृत पाजून संजीवन दिले,
त्यांची मने दुखवू नका ।

ज्यांनी तुम्हाला जन्म दिला,
त्यांना तुम्ही आजन्म विसरु नका ।

ज्यांनी तुमच्यावर लाखो खर्च केले,
त्यांच्या उपकाराची फेड करता येत नाही ।

त्यांचे लाख, तुमच्यासाठी केवळ राख आहे ।

Monday, September 22, 2008

मी लहान होतो तेव्हा.....

मी लहान होतो तेव्हा.....
सायकलसाठी रडत होतो ।
आजची मुले बाईकसाठी भांडत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
झाडाच्या पानाची पिपानी वाजवत होतो .
आजची मुले ओर्गन, बेन्जो वाजवत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
गोटया, सुरफाटया खेळत होतो .
आजची मुले कँरम, क्रिकेट खेळत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
आईला "आई" म्हणत होतो .
आजची मुले ममा म्हणत आहेत .

मी लहान होतो तेव्हा
आईच्या कुशीत झोपयाचो.
आजची मुले प्रेयसीची कुशी शोधताहेत.

Thursday, September 18, 2008

विचार कसे असावेत ???

राजवाडयाच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडेसुद्धा लोक कौतुकाने पाहतात।

लहानपणीच्या आठवणी किती नाजुक, मोहक, बहुरंगी असतात जणू काही मोरपिसेच।

मूल कितीही मोठे झाले तरी आईसाठी ते लहानच असते।

आयुष्याच्या आरंभी ज्यात अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी वाटू लागते।

शब्दापेक्षा स्पर्श बोलका असतो पण त्याला काही माणसाच्या काळजाला हात घालता येत नही ते काम अश्रुनाच साधते ।

आई वडिलांची दू:खे मुलांना कधीच कळत नाहीत।

कळी सदैव कळी राहू शकत नाही आज ना उद्या तिला फुलावेच लागते, मोठे व्हावेच लागते।

हे जग माणसाच्या दयेवर चालत नाही।

पुरुषांचा जन्म पराक्रमासाठीच असतो।

माणुस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही प्रसंगी ते त्याचेच वैर साधते।

ज्याला जगायचं आहे त्यानं जिथं मृत्यु स्वच्छंदे क्रीडा करीत असतो तिथं कशाला जावं।

- उज्वला जगदाळे

Wednesday, September 17, 2008

मेल्यावरचे सुख

जिवंतपणी ज्याच्यावर हसत असतात त्यासाठीच नंतर रडताना दिसतात।
जिवंतपणी किम्मत देत नाही नंतर मात्र गुणगान गाई।

जिवंतपणी शिव्यांचा भडिमार नंतर मात्र कौतुकांचा सागर।
जिवंतपणी थंड पाणी नहायला नंतर मात्र गरमागरम भाजायला।

जिवंतपणी राग राग करतात नंतर मात्र पदराने वारा घालतात।
जिवंतपणी मी तुमचा कोणीही नाही नंतर मात्र मीच एकुलता वारस राही।

Tuesday, September 16, 2008

नाजुक क्षणी

एका नाजुक क्षणी
दोन मने एकत्र येतात।

एका नाजुक क्षणी
दोन शब्दही चिरतात।

काही नाजुक क्षण
पाहिजेत समजुतीचे।

काही नाजुक क्षणी
हवी फुंकर प्रेमाची॥

Wednesday, August 20, 2008

मलाही वाटतं मैत्रिण असावी।

एक मैत्रिण असावी

माझी वाट पाहणारी

मला पाहिलं की

खुदकन हसणारी।

एक मैत्रिण असावी

की, जीला पाहताच

ह्रदय भरून यावं , तिनं हसावं

अन् मी पहात रहावं।

एक मैत्रिण असावी

की जिची मीही वाट पहावी,

पण ती नाही आली तर

जीवाची उलघाल व्हावी।

Tuesday, August 12, 2008

आपण कोण आहोत ?

आपण कोण, कुठे व कसे आहोत

याचा जर आपणच शोध घेतला तर

आपणास आपली पात्रता काय आहे याची जाणीव होईल

त्यानुसार आपण आपली प्रगती करू शकू।

म्हणून आपण नेहमीच चांगले शिकण्यासाठी प्रयत्नशील असलेच पाहिजे।

तूच आहेस

चांदण्या रात्रीत जर
कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,

गुलाबी थंडीत
जर कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,

पावसात भिजताना

जर कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,

एकाकी
जीवन जगताना
जर कुणाची आठवण येत असेल
तर ती तूच आहेस,

मला आठवणीत

जगायला लावणारीसुद्धा तूच आहेस.


Tuesday, July 22, 2008

मी आणि माझं नाटक २००७

नाटक:- ठिनगी , कलाकार: सुनील जगदाले, अवघडे गुरूजी , गीता पाठक, संदीप, जयवंत,विठ्ठल।

Friday, July 18, 2008

वेळ

आपण काय लिहावं याचं बंधन नाही पण लिहिताना विचार करुन लिहावं हे मात्र लक्षात ठेवायला हवं

असं खुप वाटतं की कुणीतरी वाचावं आपलं लिखाण आणि कळवाव्यात प्रतिक्रिया

पण आपण केलेलं लिखाण वाचायला इथं वेळ कुणाकडे आहे

वेळेलाही जर वेळेइतके महत्व दिले नाही तर आपल्यावरच एक वेळ अशी येईल की वेळेअभावी आपण काहीच करू शकणार नाही पण तेंव्हा वेळ निघून गेलेली असेल

असे माझ्यासारखे एक नाही अनेक ज्ञानाचे डोस पाजणारे मिळतील पण त्यातून सुधारायचे तर आपल्यालाच आहे ना?

Thursday, June 19, 2008

त्यातच सारं आलं.

तू मला नाही फसलीस
पण मागे फिरून हसलीस
त्यातच सारं आलं,


गजबजलेल्या गर्दीत

माझी नजर तुला शोधते,
दुरुनसुद्धा तू

माझी नजर रोखते
त्यातच सारं आलं,


नजरेस नजर देताना
उगाच घाबरायला होते
तू माझ्याकडे

चोरून चोरून पाहते
त्यातच सारं आलं,


क्षणभर तुझे आस्तित्व
तुही विसरतेस
मलाही आस्तित्वाची

जाणीव करून देतेस
त्यातच सारं आलं.

Thursday, June 12, 2008

थोडसं हसू

आज मला
मनापासून वाटतं की,
तू भेटावस
एकदा वाटतं
न भेटलेलं चांगलं ,
कारण मी आज
तू घेतलेला शर्ट
घातला नाही
जाऊ दे..........
येताना पँट घेउन ये।
नंतर तुला भेटताना
दोन्ही घालून
तुला दाखवायला येइन.


Monday, June 9, 2008

तू

प्रत्येक क्षणी
तुला पाहावस वाटतं।
प्रत्येक क्षणी तू
मजपाशी असावसं वाटतं।
माझ्या वागन्यावर
तुझं लक्ष्य असावं।
माझ्या बोलन्यावर
तुझं नियंत्रण असावं।
मी कष्ट करावं
तू फक्त पाहात बसावं।
मी चुक केल्यावर
माझ्यावर रागवावं।
अन तू रागावल्यावर
अधिकच छान दिसतेस हे मी सांगावं।
त्यासाठी तू सतत
माझ्याबरोबर असावं।

Friday, June 6, 2008

पक्षी

दोन टोकावरचे दोन पक्षी खुनावतात एकमेकांना
राघुमैनेचे गोडगुपित जणू सांगतात सर्वांना ।


इश्यार्र्यातून वाचा फूटते त्यांच्या गुप्त भावनांना,
मूक पक्ष्यांची भाषा समजते प्रेम वेड्या मनांना।

राघुमैनेचे गुपित सांगून दोन जीव येतात एकत्र,
मैत्रिचे धडे गातात सप्त सुरांतून सर्वत्र।

मोर बोले मोरनीला राघू मैना किती हुशार,
जाणते अजाणतेपणी करती प्रेमाचा भडिमार।

नवलापोटी पक्ष्याना वाटे अशी असावी जवानी,
कोकिलासुद्धा गोड-गोड गाई राघुमैनेचिच कहानी।


पाउस

पावसाची सुरूवात झाली, क्षणभरासाठी तप्त उन्हाचा विसर पडला। सर्वजन ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तो मेघराजा एकदाचा सुखद क्षण घेउन आलाच.

Thursday, June 5, 2008

आभार

आपण जी माझी माहिती नेटवर पाहतो आहे याचे पूर्ण श्रेय खुशाल गोहिल यालाच जाते , जो माझा चांगला मित्र आहे। त्याबद्दल त्याचे शतश: आभार.

दिसतं तसं नसतं


फुलाच्या रंगावरून त्याचा सुगंध समजत नाही,
माणसाच्या दिसन्यावरून त्याचा स्वभाव समजत नाही .

Monday, June 2, 2008

आज

४.६.2००८
आज मालवणचे लाडू खाल्ले खूप मजा आली.

Tuesday, May 27, 2008

Sunset

कौन कहता है मुम्बई मे sunset देखने को नही मिलता??
आप घर से बाहर निकलोगे तब ना?
ये वही नजारा है जहा पर लाखो लोग सुबह शाम आते रहते है.
"Marine Drive" near to Gate way Of India.
खास बात ये है की, ये फोटो मैंने मेरे चाइना मोबाइल से खींची है.

Thursday, May 22, 2008

Dosti

Dosti toh sirf ek ittefaaq hai,
Yeh toh dilon ki mulaakaat hai,
Dosti nahi dekhti yeh din hai ki raat hai,
Isme toh sirf wafaadaari aur jazbaat hai