Thursday, February 13, 2014

माझा दादा

माझा दादा माझ्यासाठी आई-बाप होतो
दु:ख तो घेतो आणि मला सुख देतो.

मला शिकविण्यासाठी स्वत: आडानी राहतो
मला शाळेत पाठवतो आणि तो शेतमजूरीला जातो.

शेतावर जातानाही अनवाणी जातो
आणि मला मात्र, नवीन बूट आणून देतो.

फाटक्या कपड्यानी स्वत: सण साजरे करतो
माझ्या वाढदिवसाला मात्र, मला नवे कपड़े आणतो.

पाठीवर हात ठेऊन शिकायला प्रोत्साहन देतो
मोठा होऊन दाखव, असे निक्षुनही सांगतो.

दादाच्या कष्टाचे फळ मला द्यायचे आहे
माझ्या सकट दादालाही आनंदी ठेवायचे आहे.

ऋतु हिरवा

ऋतु हिरवा तहानलेला,
पहिल्या पावसाने सुखावलेला
अन शांत निजलेला.

ऋतु हिरवा फुललेला,
जणू गालीचा पसरलेला
अन झुल्यावाचून झुललेला.

ऋतु हिरवा आसमंतातला,
कधी उन्हात थिजलेला
तर कधी पावसात भिजलेला.

ऋतु हिरवा गर्द झाडीतला,
श्रीमंतांच्या माड़ीतला
अन गरीबांच्या वाडीतला.

Tuesday, March 26, 2013

एक मैत्रीण

एक मैत्रीण अशी असते
न बोलताही मनातले ओळखुन जाते॥

‘आई’ ची जाणीव तिच्यात असते
‘मुलां’ची काळजी ती आवर्जून घेते
‘पती’ला ती परमेश्वर मानते
‘सासु-सासरे’ यांचीहि ती पूजा करते॥

माहेरी जायलाही ती विसरत नाही
तिकडे ‘आईबाबां’ची तीच काळजी घेई   
नाती जपण्याची शिकवण देत राहते 
जबाबदारीने भविष्याशी हितगुज करते॥

एक मैत्रीण अशी असते
जी मैत्रीण असूनही बरेच काही असते
सर्वासाठी सर्व नाती जपते आणि
तरीही ती माझी ‘मैत्रीण’ असते॥

एक मैत्रीण अशी असते
न बोलताही मनातले ओळखुन जाते॥

म्हणून मैत्रीण ही ‘मैत्रीणच’ असते ॥ 

Monday, March 25, 2013

खूप खूप शुभेछा.....

तुझ्यावर कुणाचीही सत्ता नव्हती
तुझीच इतरांवर सत्ता होती
हे अनुभवाने तू सांगत होती
कामांतून तू ते दाखवत होती.

काहीतरी नवीन करण्याची
तुझी इच्छाशक्ति असते 
तुझी ती धडपड इतरासाठी
नेहमीच आठवणीत बसते.
 
तू विसर सर्वाना पण
विसरु नको न्यू इण्डियाला
आयुष्यात घेतली अझुन उड्डाणे जरी  
दुरुन हाक दे आम्हाला.........

आमच्यासाठी तुझी मैत्री
दुर्मीळ होणार आहे
पण आनंदाचे मनोरे अझुन
तुही फुलवणार आहे

तुझी मैत्री हवीहवीशी वाटते
काही क्षणासाठी नाही तर
अनंतकाळ असावीशी वाटते
म्हणून निरोप घेता अन्तर्मनही दाटते
 
उत्तरोत्तर प्रगति होवों, हीच आमची सदिच्छा
पुढील आयुष्यासाठी, खूप खूप शुभेछा.....

Wednesday, February 13, 2013

रात्र व्हावी असं मला मुळीच वाटत नाही


क्षणभराच्या  विश्रांतीसाठी
रात्रभर आपण झोपतो
जाग आल्यावर मात्र
नशिबावर कोपतो .

काहीतरी करून दाखवण्याची
इच्छा असते भरपूर
पण आळसापोटी मात्र
नुसतीच जीवाला हुरहुर .

आज इथे, उदया तिथे
रोजच अनुभवाचे धड़े गिरवत असतो
काहीतरी नवीन शिकण्याच्या
आनंदाने मिरवत असतो .

रात्र झाली की पावलं पुन्हा घराकडे वळतात
दिवसा रंगवलेली स्वप्नेसुध्दा मग दूरदूर पळतात .

निराशाही माझ्याशी आता बोलत नाही
म्हणून रात्र व्हावी असं मला मुळीच वाटत नाही .  
 

“आई”


अन जाणीव झाली आई तू भेटल्याची
तू सोबत नसूनही सोबत असल्याची
रात्री झोपताना तू थोपटल्याची
अंगाई गीत गात असल्याची । । अन जाणीव .......
झोपेत मला कुशीत घेतल्याची
अंगावर पदर टाकून झोपवल्याची
सकाळी उठवताना प्रेमाने मारलेल्या हाकेची
शाळेत जाताना विरहाची अन परत आल्यावरच्या भेटीची । । अन जाणीव .......

बानं बदडल्यावरच्या तुझ्या मिठीची
अन शांत करणारया तुझ्या सांत्वनाची
स्वप्नात पाहिलं तुला मी
अन जाणीव झाली आई तू भेटल्याची । । अन जाणीव ......
जागा होऊन पाहतो तर उशी सरकल्याची, अंथरून विस्कटल्याची
अन तरीही जाणीव झाली आई तू भेटल्याची.......... 

-सुनिल जगदाळे

Thursday, February 7, 2013

आई बाबा

आई बाबा माझे आहेत
मी त्यांचा नाही
ते मला विसरु शकतील
मी विसरणार नाही

मी त्यांचा असेन तर
मलाही भान ठेवायला पाहिजे
की  माझे इतर कुणीही असले तरी
मी आईबाबा सोबत जगायला पाहिजे 

मी आयुष्य जगताना
माझेकडे सर्व काही असेल
पण आईबाबा नसतील तर
आभाळहि ठेंगणे दिसेल

आईला नको पैसा आडका
बाबांनाही नको तुमची संपत्ती
त्यांना फक्त तुम्हाला हसताना पहायचय
तीच खरी त्यांची प्रगति आणि इच्छाशक्ति.

म्हणून आई बाबाना विसरु नका ....
आई बाबाना विसरु नका ....     

वंशाचा दिवा

का हवा असतो मुलगा सर्वाना ?
वंशाचा दिवा म्हणून पोसण्यासाठी ?

का सोसवेत त्रास मुलीने ?
मुलगी आहे म्हणून की सासरी जाण्यासाठी ?

काय दिवे लावतो हा मुलगा ?
गरीब असो वा श्रीमंतासाठी

पैशाची उधळण, व्यसनांचा कळस
मुलांमध्ये असतो जन्मभराचा आळस 

वंशाचा दिवा म्हणून लाडावलेला
प्रेमात आणि व्यसनात आयुष्यभर बुडालेला

ठेवा मुलीवरही विश्वास भविष्यासाठी
नका करू अट्टाहास वंशाचा दिवा असण्यासाठी .     

आई , घेऊ दे ना जन्म तुझ्यापोटी

आई, माझा त्रागा करणार नाहीस ना ?
काय बिघडलं , मी मुलगी आहे म्हणून ?

आई, मला घेऊ देशील ना शिक्षण ?
दोन्ही घरचा दिवा लावण्यासाठी

आई, मलाही देशील ना परवानगी ?
आकाशात उंच भरारी घेण्यासाठी

आई, मलाही जगु देशील ना स्वछंदाने ?
माझे आस्तित्व जपण्यासाठी

आई, मलाही करू देशील ना कष्ट ?
जगाच्या कल्याणासाठी

आई, तू पण स्त्रीच आहेस ना गं ..........
तुही जगतेस ना इतरांसाठी ..........

आई, मलाही घेऊ दे ना जन्म तुझ्यापोटी ?
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी
तुझ्यासहित सर्वाना सुखी ठेवण्यासाठी ..........       

तू

तू सोबत होतीस
कुणाचीच गरज भासत नव्हती
तुझ्यावाचून सगळ्याचीच
उणीव भासत होती

तुझ्याशी संवाद केल्याविना
दिवस आनंदी जात नव्हता
आता मात्र इतरांशी
वाद घालण्यात दिवस जात होता  

तुझे सोबत नसणे
आयुष्यच नसल्या सारखे झाले आहे
तुझ्यावाचून जगणे म्हणजे
नजरेवाचून डोळे असल्या सारखे झाले आहे

तुझ्या आठवणी लिहायला
शब्द पुरणार नाहीत
तुझी सोबत असल्यावर
आठवणीच उरणार नाहीत

तुही जग , तुझ्यासोबत मलाही जगु दे
आयुष्य एकदाच मिळते ते तुझ्यासोबत घालवू दे .

 

Friday, January 18, 2013

“तो” आणि “ती”


तो Computer

ती File

तो  Program

ती System

तो Wallpapers

ती Image

तो  CD/DVD Writer

ती CD/DVD

तो  CPU, Monitor, Mouse, Keyboard

ती Cable-wire जी या सर्वाना जोडते,

या “तो” आणि “ती” पासून जे तयार होते

ते Letter, ते Print , ते Matter, ते Description.

Monday, December 3, 2012

“तुमची नसलेली वेळ”

मी सर्वाना पाहते
सर्व मला पाहतात,
फरक इतकाच असतो की
माझी धावपळ होत नाही त्यांची होते.

मी बदलत राहते
ते बदलत नाहीत,
मी गेल्यावर परत येत नाही
ते माझ्यासाठी परत येतात.

मला जे ओळखतात
त्यांचे चांगलेच होते,
अनोळखी राहणारांचे मात्र
वाईट होत जाते.

ज्याची वाट पहावी लागते
ती “वेळ” मीच,
आणि गेल्यावर परत येत नाही
तीही “वेळ” मीच.

-सुनिल जगदाळे

Wednesday, October 17, 2012

एक नातं

एक नातं घरांशी,

हक्काच्या घरातील वस्तुशी

ज्या असतात आपुलकीने जपलेल्या ॰


एक नातं घरातील माणसांशी

आचार-विचारांच्या एकजुटीशी

ज्यामध्ये मिळते सुख आणि समाधान ॰


एक नातं माणसांमधील प्रेमाशी

विश्वासाने उभारलेल्या अतुट बंधनाशी

ज्यात नसतो नफा तोटा, असते फक्त प्रेम आपुलकी ॰


एक नातं प्रेमांमधील भावनेशी

हसण्या- रुसण्याच्या गोड स्वभावाशी

ज्यात असतो त्याग, सर्वांच्या सुखासाठी ॰


एक नातं घरांशी आणि घरातील सर्वच जणांशी ..............


-सुनिल जगदाळे

Thursday, October 11, 2012

ती अशी


ती अशी घराचे स्वप्न पाहणारी,

अन ती अशी स्वप्ने साकारणारी .

ती अशी घरामध्ये वावरते,

मन मोकळयापणाने सगळीकड़े फिरते .

ती अशी संसारातून संस्कार देणारी ,

लहान मोठयामध्येही आवर्जून मिसळणारी .

ती जेवु-खाऊ घालते, ती सगळयावरच प्रेम करते , 

स्वत:ला उरलं नाही जरी काही, तरी असेल त्यातच समाधान मानते .

अस्त-व्यस्त झाले जरी घर, तरीही तीच आवरणारी ,

आपल्याबरोबरच इतरानांही सावरणारी .

ती घर सांभाळते, घरावर लक्ष ठेवते प्रेमाने,

घर दिले हावरें बिल्डर्सनी, म्हणून आभार मानते आदराने..................

-उज्वला सुनिल जगदाळे



  

   

Thursday, September 27, 2012

क्यो चली गई ?


हजारो सवाल उठते है मन मे, जब वो घर छोड़ के भाग जाती है ,

कभी ये न सोचा हमने,  हैरान ,परेशान है वो, उनपे क्या बितती है ।


मैं आनेवाले कल के लिए जी रहा था , वो बीते हुए कल के साथ भाग जाती है ,

मैं वक्त नहीं दे पाता था उनको ,शायद इसलिए उनकी किस्मत जाग जाती है ।


मैं आज भी उनको उतनाही चाहता हूँ ,जितना पहले चाहता था ,

वो तो किसी और की हो चली , मैंने ऐसा कभी न चाहा था ।


मैंने तो हमेशा खुशिया देना चाहा है , न जाने क्या कमी रह गई ,

सवाल अब भी है मन मे , की गलती क्या हो गई ।


जिसके लिए कमाई इतनी अमानत, शोहरत, वो तो अलविदा कह गई ,

सवाल तो अब भी है मन मे , मुझे छोड़कर वो आखिर क्यो चली गई ?


-सुनील जगदाले 

Thursday, July 12, 2012

तू खुश आहेस ना? मग झाले तर.............

मी रागावते, मी ओरडते तुझ्यावर
तुला त्रास होत नाही ना? मग झाले तर............

मी हट्टी, मी स्वाभिमानी मी अशीच एकाकी
तू समजुन घेतोस ना? मग झाले तर.............

माझे हक्क, माझी बंधने तुझ्यासाठीच
तुला ती समजतात ना? मग झाले तर..............

माझी गड़बड़, माझा गोंधळ नेहमीचाच
तू सहन करतोस ना? मग झाले तर...............

मीही adjust करीन स्वत:ला थोडेसे
तू खुश आहेस ना? मग झाले तर.............

Thursday, March 22, 2012

गुढीपाडवा- हार्दिक शुभेच्छा

गुढी उभारावी सुखसम्रृध्दिची,
गुढी उभारावी समाधानाची
विसरून आपल्या भुतकाळाला
स्वप्ने रंगवावीत भविष्यकाळाची

Saturday, February 25, 2012

19.02.2012

१९ फेब्रुवारी २०१२ महाशिवरात्री दिवशी काढलेले POTRAIT.

Friday, September 16, 2011

मलाही वाटतं .....

या धावत्या जगात
क्षणभर तरी आरामात बसावं ,
मलाही वाटतं एक दिवस
बिल्कुल शांत रहावं .

ना कुणाची ट्रिंग ट्रिंग
ना कुणाचे व्हायब्रेशन ,
वर्षातून एकदातरी
आपणही करावं सेलिब्रेशन .

ना कुणाच्या हाती लागावं
ना कुणाच्या कानी ,
एक दिवस का होईना
विसरावी सर्वांचीच वाणी .

केलेले Dialled Calls
झालेले Missed Calls
आलेले Received Calls
सगळं काही विसरावं,
मलाही वाटतं एक दिवस
बिल्कुल शांत रहावं .

Monday, September 12, 2011

प्रेमात पडू लागल्यावर

आठवणींचा कहर होतो
सद्गुणांना बहर येतो,
सगळे काही पवित्र वाटू लागते
प्रेमात पडू लागल्यावर .

तहान विरून जाते
भूक हरपून जाते,
सगळे काही विसरायला होते
प्रेमात पडू लागल्यावर .

शब्द मुके होतात
विरह नकोसा होतो,
सतत सोबत रहावेसे वाटते
प्रेमात पडू लागल्यावर .

जग जिंकायचे आहे
बरेच काही कमवायचे आहे,
हे असे वेड्यासारखे होऊ लागते
प्रेमात पडू लागल्यावर .

Friday, July 29, 2011

सुनिल जगदाळे आणि परिवार

नमस्कार मित्रांनो ,
नवी मुंबई मधील नवीन चैनल city9 वर मी आणि माझी फॅमिली येत
आहोत. जाहिरात दाखवायला सुरुवात झाली आहे.पूर्ण कार्यक्र माची तारीख अझुन नक्की झाली नाही ती आपणास नंतर कळवेन सध्या सदरची जहिरातिची क्लिप पहा.
धन्यवाद.



http://www.youtube.com/watch?v=GkqqdBhEsZw&feature=share

Thursday, July 28, 2011

आधार कार्ड

UID CARD हे असे असेल आणि सर्वाना ते सक्तीचे असेल . महाराष्ट्रात "यु आय डी" अथवा "आधार कार्ड " प्रत्येकाला दिले जाणार आहे. हे कार्ड बहु-उद्देशीय असून याचा उपयोग आर्थिक आणि सामाजिक कामासाठी होणार आहे. या कार्ड प्रकारात २ कार्ड असणार आहेत १. सिटिझनशिप कार्ड आणि २. नॉन सिटिझनशिप कार्ड. दोन्ही कार्डाचा रंग आणि आकार वेगवेगळा असणार आहे. नॉन-सिटिझनशिप कार्ड हे विदेशीयांना ठराविक काळापुरते द्यावे लागणार आहे.
हे कार्ड सर्वाना सक्तीचे असणार आहे.
यासाठी नागरिकाला पालिकेने जाहिर केलेल्या केंद्रावर जावे लागणार आहे आणि तेथे
१. ओळखीचा
२. राहण्याच्या पत्त्याचा
३. जन्मदिनांकाचा
पुरावा द्यावा लागणार आहे.

केंद्रावर हे पेपर तपासून झाल्यावर नागरिकाच्या हाताच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जातील आणि प्रत्येकाच्या डोळंयाचे स्कँनिंग केले जाईल.

या
सर्व माहितीच्या आधारावर शासनाकडून १२ अंकी ओळख क्रमांक देण्यात येईल. हा क्रमांक प्रत्येकाला त्याच्या घरी पोस्ट टपालाने कळविण्यात येणार आहे.
या कार्ड साठी नागरिकाला कोणत्याही प्रकारची "फी" भरावी लागणार नाही.

Monday, July 11, 2011

वो दिन

२६ जुलाई का दिन सबको रहेगा याद ,
एक नही दो नही सौ साल बाद।
बारिश की वजह से सब थे परेशान,
अपने ही लोगों से बन गए थे अनजान।
किसी को किसी की ख़बर नही मिलती थी,
टेलीफोन तथा मोबाइल की लाईने नही चलती थी।
हर तरफ़ से मुम्बई पानी मे डूब गयी,
एक पल ऐसा लगा जैसे धड़कन रुक गयी।
कितने लोग लापता हो गए कितने हो गए घायल,
जिनके घर उजड़ गए वे तो हो गए पागल।
ऐसे मे इंसानियत ने हाथ बढाया,
जाती -धर्म तोड़कर मौत से छुड़ाया।
सलाम करते है उनको, जिन्होंने जाँबाजी दिखाई,
सर पे मौत का कफन लेके दूसरों की जान बचाई।
यही प्रार्थना ईश्वर से सबको रखना आबाद,
२६ जुलाई का दिन सबको रहेगा याद।
ईश्वर करे ऐसा दिन कभी ना आए,
दुखों के ऐसे बाढ़ किसी को ना दिखाए।

- सुनील जगदाले

Saturday, March 19, 2011

हार्दिक शुभेच्छा



रंगीन होळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

Friday, February 4, 2011

मी वाट पाहते


तुझ्याकडे येताना
मला आवर्जुन ऊशीरा यायचय,
तू बेचैन झालेली मला
दुरून चोरून पहायचय।

Friday, November 26, 2010

कमलेशचा डांस - एक आदर्श

कमलेश पटेल चा डांस सर्वांसाठी एक आदर्शच ठरू शकतो । मला खुप आवडला ..........तुम्हाला॥???

पाहण्यासाठी शिर्षक (title) " कमलेश पटेल "वर क्लिक करा।

एक लम्हा २६/११

एक रोज मै भी, उसे प्यार करता था

दिन रात उसकी, यादोंमे खोया रहता था।



हर शाम उसका, इंतजार मै करता था

उसकी एक हँसी के लिए, हर पल तरसता था।



उसके साथ रहने से, सारे जहाँ को भूल जाता था

उसके न होने से, खोया खोया सा रहता था।



उसके लिए मै, पूरी दुनिया से लड़ सकता था

इतना दिलों जान से मै, उसे प्यार करता था।


एक लम्हा जिंदगी का, मुझे छुकर निकल गया

आतंकियोंके एक धमाके से, मेरा सबकुछ दफन हो गया।

Thursday, November 25, 2010

मी मुंबई बोलतेय २६/११

मी मुंबई बोलतेय.......
ऊन, वारा, पाऊस मी माझ्या छातीवर झेलतेय,
मी मुंबई बोलतेय।

माझ्यावर केल्या जखमा कितीही
त्याही मी सर्व भरून काढ़तेय,
मी मुंबई बोलतेय।

माझ्या प्रगतीची वाटचाल असणाया
वाहतुकीवर केले वार कुणी
तरीही ते मी पेलतेय,
मी मुंबई बोलतेय।

माझी शान असणाया शिरावर
घातले घाव जरी
तेहि सर्वांसाठी मी सहन करतेय,
मी मुंबई बोलतेय।

मला चांगले, वाईट कोण काही कळत नाही
म्हणूनच सर्व बनतात माझे आश्रित
हेही मला कळतेय,
मी मुंबई बोलतेय।

Monday, November 15, 2010

अविस्मरनीय क्षण मैत्रीचे १०१०१०

योगायोग होता तो "श्री कानिफनाथ कराळे" यांना मुलगा झाल्याच्या आनंदाचा कारण मुलगा जन्माला आला तोही दिवस एक- विशेष आहे आणि तेच सर्वात मोठे आश्चर्य आहे, दि ""१०/१०/१० "" हा दिवस आम्ही आमच्या अस्तित्वापर्यंत विसरु शकणार नाही त्याच दिवशी सकाळच्या सुमारास कराले यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही याचे औचित्य साधून कराळे परिवाराने एका पार्टीचे आयोजन शनिवार दि १३/११ /२०१० रोजी केले आणि त्या आनंदात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळाले ठरल्या वेळेप्रमाने आम्ही सर्वजन पार्टीला हजर झालो . फक्त आणि फक्त "ट्रेनचेच" मित्र .. काही सकाळच्या ग्रुप मधील तर काही संध्याकाळच्या ग्रुप मधील पण मैत्री ट्रेनचीच . काय मज्जा आली म्हणून सांगू........ शब्दात सांगने कठिन आहे , मैत्री कशी टिकवायची आणि जपायची हे कराले परिवाराकडुनच शिकावे विशेषत: "अशोक कराळे " "वाळूंज साहेब" (मोटरमन) आणि "किशोर कदम " . एकुण २२ जणांची ही जंगी पार्टी मोठ्या थाटात पार पडली पण काही मित्रांनी आमंत्रण असुनही मिस केली। असो...

मला अशा ट्रेन -मित्रांबरोबर मैत्री करायला खुप आवडेल असेच क्षण मी त्यांच्या सोबत पुढेही शेअर करीन।

मला आणि सर्व ट्रेन मित्रांना एकत्र बोलाविल्याबद्दल कराले परिवाराचे शतश: आभार....

-सुनिल जगदाळे

Tuesday, November 2, 2010

हार्दिक शुभेच्छा


दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


-सुनील जगदाले